निफाड तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय तेजीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निफाड तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय तेजीत

देविदास बैरागी/ निफाड - निफाड तालुक्यातील प्रत्येक गावातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरु आहे.निफाड तालुक्यातील नदी पात्रातील वा

हिंद सेवा मंडळावर आले चार नवे चेहरे
आमदार अपात्रतेचा उद्या निकाल ?
आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधार बनलेल्या सूर्यकुमारला मोठा फटका
देविदास बैरागी/ निफाड – निफाड तालुक्यातील प्रत्येक गावातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरु आहे.निफाड तालुक्यातील नदी पात्रातील वाळू चा लिलाव जाहीर होऊन हि कोणीही ठेकेदार लिलाव घेण्यासाठी पुढे आले नाही. काही गावातील नागरिकांनी वाळू लिलावास विरोध हि केला. वाळू लिलावातून राज्य सरकारच्या तिजोरीत महसूल जमा झाला असता परंतु तालुक्यात कुठल्याही नदी पात्रातील वाळूचा लिलाव न झाल्याने अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे.या अवैध वाळू उपसा असण्याला स्थानिक पातळीवरील तलाठी,सर्कल जबाबदार आहे. होणाऱ्या वाळू उपसा मधून अवैध येणारा महसूल कुणाच्या खिशात जात आहे याची चौकशी करण्यात यावी.निफाड प्रशासन वाळू, मुरूम, माती, दगड उपसा करणाऱ्या माफियांच्या पाठीशी असल्याशिवाय दिवसा ढवळ्या असले गोरखधंदे सुरू असू शकत नाही.तालुक्यातील नागरिकांनी याबाबत महसूल विभागाला वारंवार कळवूनही महसूल विभागाचे गौण खनिज अधिकारी याकडे सोयीस्कर पणे अर्थपूर्ण दुर्लक्ष्य करीत आहेत.असेच सुरू राहिले तर निफाड तालुक्यातील नागरिकांचे निफाड महसूल प्रशासनावरील विश्वास उडेल. वाळू उपसा बंद असतांना देखील ग्रामीण व शहरी भागातील बांधकाम व्यावसाय जोरदार सुरू आहे. किती बांधकाम व्यावसायिकाच्या चौकशी करून कारवाई करण्यात आली.काही दिवसांपूर्वी निफाड महसूल वर प्रश्न चिन्ह असल्यानेच की काय बोकडदरे येथे खुद्द नाशिक गौण खनिज विभागाने कारवाई केली. निफाड महसूल विभागाच्या कानोकान खबर न देता धाड टाकली होती. त्यामुळे आता हि हिच पुनरावृत्ती करून धाड टाकून धाडस केले तर नागरिकांना विश्वास वाटेल. तालुक्यातील जागरूक नागरिकांनी कित्येक वेळा भरलेली वाहने अडवली मात्र मुजोर वाळू माफिया व त्यांना साथ देणारे महसूल विभागाचे सर्कल,तलाठी यांच्यामुळे स्थानिक नागरिक हतबल झाले आहेत.आपुन दोघे भाऊ वाटून वाटून खाऊ या प्रमाणे अवैध वाळू उपसा सुरू आहे.वाळूच्या अवजड वाहनांमुळे निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी काठच्या गावांच्या रस्त्यांची चाळन झाली आहे. परिसरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.त्यामुळे नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे,  नाशिक गौण खनिज महसूल विभागाने याकडे लक्ष्य द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे.निफाड तालुक्याला अवैध वाळू उपसा धंद्यांणमुळे लागलेली किड त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने निफाड तहसिल कार्यालायसमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा दिला आहे.

COMMENTS