ना. वडेट्टीवार यांच्याकडे अतिवृष्टीग्रस्त भागात दौरा करण्यास आग्रह धरणार: बाळासाहेब सानप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ना. वडेट्टीवार यांच्याकडे अतिवृष्टीग्रस्त भागात दौरा करण्यास आग्रह धरणार: बाळासाहेब सानप

अभिजित खंडागळे/पाथर्डी : अहमदनगर जिल्हा,संभाजीनगर व बीड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्य

मनोधैर्य योजनेने दिला महिलांना आधार ; जिल्ह्यातील 109 पीडितांना पावणे दोन कोटी रुपयांचे अर्थसाह्य
कडक टाळेबंदी पाळणे सर्वांच्या हिताचे : नगराध्यक्ष वहाडणे
मधुरा पिचड एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण

अभिजित खंडागळे/पाथर्डी : अहमदनगर जिल्हा,संभाजीनगर व बीड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी या भागात नामदार विजय वडेट्टीवार यांना दौरा करण्याचा आग्रह धरत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.पाथर्डी शेवगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बाळासाहेब सानप यांनी पाथर्डी येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी बोलत ते होते. यावेळी काँग्रेसचे महेश दौड, ऋषी सानप,कीर्तने आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की ,काल मी सोलापूरला जात असताना मला बऱ्याच ठिकाणावरून फोन आले त्यावेळी माझ्या सोबत पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार असताना त्यांना भ्रमणध्वनीद्वारे  व्हीडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नुकसानाचे चित्र  दाखवले.त्यावेळी त्यांनी तत्काळ अहमदनगर जिल्ह्याधिकारी यांना संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानाचे  पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करून त्यांचा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.सदरील पावसामुळे शेतकऱ्यांचे जनावरे मरून पडली,पिकांचे,पैसाचे,घराचे अतोनात नुकसान झाले असून जोपर्यंत या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठवपुरावा करणार आहोत.तसेच यात राजकारण न करता सर्वांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करत त्यांना या संकटातुन उभारी देण्याचे काम करावे.असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले

COMMENTS