नाशिकच्या नामवंत मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नाशिकच्या नामवंत मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

नाशिक : नाशिकच्या आडगाव येथील मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रक

लोकसभा निवडणुकीसाठी भरारी पथके तयार
जलपुनर्भरण चळवळ गतिमान करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे सरसावल्या
शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

नाशिक : नाशिकच्या आडगाव येथील मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकानी सिनियर विद्यार्थिनीच्या रॅगिंगमुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप केला आहे.परंतु कॉलेज प्रशासनाने आरोप फेटाळत मृत शिकाऊ डॉक्टरवर उपचार सुरू होते,असे सांगितले आहे.तसेच सदर प्रकरणी समिती नेमून चौकशी करणार असल्याची माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,बीड येथील स्वप्नील महरुद शिंदे हा स्त्री व प्रसूती रोग तज्ञ चे २०२० पासून आडगाव मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेत होता.मंगळवार रोजी स्वप्नील हा शस्त्रक्रिया विभागा तील बाथरूम मध्ये सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बेशुद्धावस्थेत आढळून आला यावेळी संबंधित प्रशासनाने त्यावर लागलीच उपचार सुरू केले होते. परंतु रात्री जवळपास साडेदहा वाजेच्या सुमारास स्वप्नील यास मयत घोषीत केले.सदर घटना ही त्याचे आई वडील व नातेवाईकांना कळविण्यात आली.मयत स्वप्नील चे वडील महारुद्र शिंदे यांनी ,मुलाचा मृत्यू हा दोन मुली सतत केलेल्या रॅगिंग मुळे घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला.यावर मेडिकल कॉलेज प्रशासनाने स्वप्नील यावर उदासीनता व नैराश्य संदर्भात उपचार सुरू होते.याची सर्व कल्पना स्वप्नीलचे घरच्यांना होती असे सांगितले आहे.

COMMENTS