संगमनेर प्रतिनिधी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे रायात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्या जबाबदार्या सांभाळत असून संगमनेर तालुका व शहराच्या
संगमनेर प्रतिनिधी
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे रायात अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार्या जबाबदार्या सांभाळत असून संगमनेर तालुका व शहराच्या विकासात ते सातत्यपूर्ण लक्ष देत असतात. एवढा कामाचा व्याप असूनही आज सकाळी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी गंगाबाई घाटावर आलेल्या मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांसमवेत मनमोकळा संवाद साधत या परिसराची पाहणी केली.व या वेळी संपूर्ण गंगामाई घाटाचे नव्याने सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळी गंगामाई घाट परिसरात नामदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी मॉर्निंग ग्रुप ला भेट दिली. याप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे ओंकार भंडारी, ओम प्रकाश असावा, विश्वासराव मुर्तडक राजेंद्र सोमानी, जगदीश अट्टल, प्रकाश कलंत्री, किशोर टोकसे, मधूसुदन नावंदर, किशोर पवार, धनंजय डाके, निखील पापडेजा, राजेंद्र गुंजाळ, दीपक मणियार,सुभाष मणियार यांसह गंगामाई परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते. बर्याच दिवसानंतर नामदार थोरात यांचा प्रसन्न वातावरणात सकाळी या सर्व सहकार्यांशी दिलखुलास संवाद झाला.
याप्रसंगी नामदार थोरात यांनी पूर्ण गंगामाई घाट परिसराची पाहणी केली यावेळी या घाटाची पूर्ण सुशोभीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक ,वृद्धांसाठी बसण्याची व्यवस्था, मुलांसाठी क्रीडा पार्क, ओपन जीम असे विविध व आद्यवत कामे याठिकाणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, कोरोना संकटातही संगमनेर शहरासाठी व तालुक्यासाठी आपण सातत्याने निधी मिळवला आहे. रायात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना संगमनेर तालुक्याच्या लौकिक आपण कायम वाढविला असून यामध्ये तालुक्यातील जनतेचे प्रेम कायम पाठीशी राहिले आहे. आगामी काळातही सातत्याने विकासाच्या योजना राबविल्या जाणार आहे. संगमनेर सुसंस्कृत व शांत शहर म्हणून रायात लौकिकास्पद ठरले आहे. आगामी काळामध्ये एसटी स्टँड ते इंजिनिअरिंग कॉलेज च्या दरम्यानचा रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून दुभाजकांसह विदयुतीकरण केले जााणार आहे.
नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, गंगामाई परिसर हा प्रसन्न परिसर आहे. या परिसरात आल्यानंतर प्रत्येकाला अत्यंत सुखद वाटते. या परिसराचे नव्याने सुशोभीकरण होणार असून या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक ,जीम पार्क अशा सुविधाही पुरवल्या जाणार आहे. संगमनेर शहरातील नागरिकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देण्यासाठी नगरपरिषद कायम कटिबद्ध असून हा विकासाचा एकोपा कायम ठेवताना आपल्याला संगमनेर शहर देशात अव्वल बनवायचे असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी ना.थोरात यांनी मॉर्निंगवॉकच्या सर्व सदस्यांबरोबर संवाद साधला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमकार भंडारी यांनी केले. यावेळी प्रवरा माई मॉर्निंग व ग्रुपमधील सदस्यांनी महसूल मंत्री नामदार थोरात यांच्या समवेत अत्यंत दिलखुलास पणे मनमोकळा संवाद साधला.
COMMENTS