नामदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नामदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

संगमनेर प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी आज जमिनीवर बसून आदिवासी शाळेतील

लोकांचे कैवारी बनणाऱ्यांची प्रतिमा येणाऱ्या निवडणुकीत सर्वांसमोर आणू ; खासदार डॉ. सुजय विखे
आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश
LOK News 24 Iराहुरीतील फॅशन शु पॅलेस दुकान ७ दिवस सील

संगमनेर प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी आज जमिनीवर बसून आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधत पर्यावरण जागृती, वृक्षसंवर्धन संगोपन याबाबत हसत – खेळत चर्चा करत आदिवासी बालगोपाळांमध्ये ते रमले.
 कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळेत आज पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधला यावेळी कृषी राज्यमंत्री नामदार डॉ. विश्वजित कदम , खासदार सदाशिव लोखंडे , आ.डॉ सुधीर तांबे , प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात,डॉ.हर्षल तांबे, सौ.शरयुताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात,मुख्याध्यापद दशरथ वर्पे, बाळासाहेब उंबरकर, मुख्य वनसंरक्षक नितिन गुदगे आदी मान्यवर उपस्थित होते पस्थित होते.
 आदित्य ठाकरे यांनी कोणतेही औपचारिकता न करता थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन मांडी घालत त्यांच्याबरोबर संवाद साधला. आदिवासी दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि तोही मंत्री आपल्या समवेत बसून आपल्याशी गप्पा मारतो आहे यावर  विद्यार्थ्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी अगदी प्रेमाने त्यांच्या बोलीभाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण जाणीव जागृती वृक्षसंवर्धन संगोपन याबाबत दिलखुलास संवाद केला
 यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोना संकट आपण सर्वांनी अनुभवले आहे. प्रत्येकाने दोन वर्ष चेहर्‍यावर मास्क लावला आहे. आता तो मास्क नको वाटतो. यापुढे पुन्हा असे संकट येवू द्यायचे नसेल तर प्रत्येकाने दरवर्षी दोन वृक्ष लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. विद्यार्थी हे खरे वृक्षदूत असून त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांवर नातेवाईकांमध्ये ती हट्टाने पर्यावरणाची जाणीव जागृती घडवून आणणे गरजेचे आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यातील दंडकारण्य अभियानाच्या चळवळीत सर्व विद्यार्थ्यांचे कामे अत्यंत कौतुकास्पद आहे. आदिवासी डोंगर वाड्यात राहिलेले विद्यार्थी वन्यप्रेमी असतात. खर्‍या अर्थाने मोकळा श्वास या विद्यार्थ्यांना मिळतो आहे. याचा आनंदही आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नेहमी  काटक असतात. या विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांना संधी मिळाल्यास ते अत्यंत यशस्वीपणे पार पाडतात असेही ते म्हणाले
 यावेळी आदित्य ठाकरे यांचे स्वागत आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याने केले. पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी या आदिवासी समूहाला मुंबईला येण्याचे निमंत्रणही दिले हा सर्व साधेपणा पाहून सर्व विद्यार्थी भारावले
  तर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, रायाचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे हे अत्यंत साधे व्यक्तिमत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. त्यांचाच वारसा आदित्य ठाकरे चालवत असून जयहिंद आश्रम शाळेतून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर काम करत आहे. ही रायातील आदर्शवत मॉडेल रुपी अशी आदिवासी आश्रम शाळा असल्याचे ते म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले तर मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी आभार मानले. 

COMMENTS