नशा करणार्‍या अधिकार्‍याची खात्यांतर्गत चौकशी सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नशा करणार्‍या अधिकार्‍याची खात्यांतर्गत चौकशी सुरू

नगर शहरात काम करीत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अशोक’ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
संपावरील शिक्षकांनी भरलेल्या चार शाळा दिल्या चक्क सोडून…
आमदार प्रा. राम शिंदेंनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहरात काम करीत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. कर्तव्यावर असताना नशा करताना हा अधिकारी आढळून आल्याचे समजते. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असून संबंधित अधिकार्‍याला नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलेले असताना काही ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावर कामाचा मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत एक वरिष्ठ अधिकारी कर्तव्यावर असताना नशा करताना आढळून आला. वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित नशा करणार्‍या अधिकार्‍याला वारंवार संपर्क केलेला होता. मात्र, त्याचा संपर्क होऊ शकला नाही म्हणून त्या अधिकार्‍याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी एक पथक त्याच्या शोधासाठी पाठवले होते. संबंधित अधिकारी हा त्या ठिकाणी नशा करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याला सांगून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आता खातेअंतर्गत चौकशीमध्ये काय समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासंदर्भातला अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.

COMMENTS