नवी मुंबईत 350 कामगारांचे बोगस लसीकरण

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

नवी मुंबईत 350 कामगारांचे बोगस लसीकरण

नवी मुंबई : मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरणाचा प्रकार समोर आला असून, दोन्ही घटनेतील आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तुर्भे एमआयडीसी मध्ये

टीएमटीच्या ताफ्यात येणार 100 वातानुकूलीत ई बसेस
अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. अमोल वैद्य
मनसेने घातला महाविकास आघाडी सरकार पुतळ्यास दारूचा अभिषेक

नवी मुंबई : मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरणाचा प्रकार समोर आला असून, दोन्ही घटनेतील आरोपी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या टोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात 352 कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व कामगारांचे लसीकरण केले होते. यासाठी त्यांनी कंपनीकडून 4 लाख 24 हजार रूपये बिल आकारल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत हे बनावट लसीकरण झाले आहे. कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण भरवण्यात आले होते. या लसीकरणाची जबाबदारी केईसीपी हेल्थ केयर हॉस्पिटलवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार डॉ. मनीष त्रिपाठी यांनी त्यांचे पथक त्याठिकाणी पाठवले होते. 23 एप्रिलला हे शिबीर भरवले असता त्यावेळी कंपनीतल्या 350 कामगारांचे लसीकरण करून 4 लाख 24 हजार रुपये उकलण्यात आले होते. याशिवाय लसीकरण केल्याचे त्यांना बनावट प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते. मात्र काही कामगार दुसरा डोस घेण्यासाठी गेले असता, त्यांना पहिल्या डोस घेतल्याचे देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार कंपनीतर्फे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड, उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांच्यामार्फत तपास सुरु होता. यामध्ये कंपनीच्या 350 कामगारांना बनावट लस देण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार शुक्रवारी रात्री तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS