Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नीलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता !

खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याने या चर्चांना उधाण

मुंबई : महायुतीमध्ये जागा वाटप अजूनही अंतिम झाले नसले तरी, महायुतीतील तीन पक्षांच्या विद्यमान आमदार लक्षात घेता, त्या पक्षाला त्या त्या जागेवर सं

आगीच्या वाढत्या दुर्घटना
महात्मा फुले कृषि विद्यापीठात सॉफ्टवेअरचे दोन आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न
तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी नियमित डॉक्टर उपलब्ध असावे ; काँग्रेसची मागणी

मुंबई : महायुतीमध्ये जागा वाटप अजूनही अंतिम झाले नसले तरी, महायुतीतील तीन पक्षांच्या विद्यमान आमदार लक्षात घेता, त्या पक्षाला त्या त्या जागेवर संधी देणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र नीलेश राणे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आले आहे.
निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. त्या पाठोपाठ आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले आहे. निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र युतीमध्ये एकमेकाचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. आमची युती एवढी घट्ट आहे की यात एकमेकाचे उमेदवार बदलले जातील, अशी रोखठोक भूमिकाही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणे हे उमेदवार असतील. मात्र कोणत्या पक्षातून असतील हे स्पष्ट नाही. यावर बोलताना दीपक केसरकर यांनी निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच आहे.

COMMENTS