अहमदनगर :- जवळपास साडेपाचशे वर्षांचा इतिहास अहमदनगर शहराला आहे.तो सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रामाणिक प्रयत्न स्थानिक पातळीवर सुर आहेत,त्यासाठी पर
अहमदनगर :- जवळपास साडेपाचशे वर्षांचा इतिहास अहमदनगर शहराला आहे.तो सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रामाणिक प्रयत्न स्थानिक पातळीवर सुर आहेत,त्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून जे शक्य आहे ती सर्व मदत पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात येईल.पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपल्या शहराचा ठेवा सोशल मीडिया माध्यमातून सर्वापर्यांत पोहोचवण्याचा प्रयत्न करू,असे प्रति पादन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण,पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने (जीतो) उभारलेल्या जितो गॅलरी चे उद्घाटन राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी त्या बोलत होत्या.आ.संग्राम जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला राज्यमंत्री तटकरे यांनी या ऐतिस हिक वस्तू संग्रहालयातील ठेवा आवर्जून आणि कुतूहलाने पाहिला. याठिकाणी जातं केलेल्या वस्तू, त्यातून नागरिकांना होणारी इतिहासाची ओळख या बाबी खूपच महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.जितो गॅलरी मध्ये अहमदनगर शहराची ओळख सांगणाऱ्या ऐतीसहिक वस्तूंचा ठेवा प्रतिकृतींच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे.ही माहिती डिजिटल स्वरूपात पर्यटकांसमोर यावी,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.एखादे ॲप किंवा डिजिटल पद्धतीने ती माहिती अधिक नागरिक आणि पर्यटक यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा,त्यासाठी मदत करू.अर्थात,त्यासाठी अशा ठिकाणी मूलभूत सुविधा निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या वस्तू संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आणि इतिहास जपण्यासाठी याठिकाणी होत असलेले काम पाहून खऱ्या अर्थाने आनंद आणि समाधान वाटत असल्याची भावना राज्यमंत्री तटकरे यांनी व्यक्त केली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले,नगर शहराचे महत्व सातासमुद्रापार गेले पाहिजे.येथील इतिहास, संस्कृती सर्वांना माहिती व्हावी यासाठी ऐतिहासिक ठेवा जपला गेला पाहिजे.त्यामुळे या गॅलरीचे महत्व अधिक आहे. इतिहासा चा वारसा जपताना आधुनिक नगरची उभारणी व्हावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.त्यामुळेच जितो फाउंडेशन ने आणि मुनोत आणि मुथा कुटुंबीयांनी या गॅलरी उभारणीसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
COMMENTS