Homeशहरंअहमदनगर

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात कोविड नियमांचे पालन करुन होणार ‘श्री’ची प्राणप्रतिष्ठा – अ‍ॅड.अभय आगरकर

नगर - राज्यासह देशात कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहे. राज्यातील मंदिरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे यंदाह

रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, २४ जुलै २०२१ l पहा LokNews24

नगर – राज्यासह देशात कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहे. राज्यातील मंदिरे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव हा अगदी साध्या पद्धतीने शासनाच्या कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी श्री गणेश चतुर्थी दिनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते ‘श्री’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी सांगितले.

 मंदिरात दहा दिवस नित्यनियमाने पुजा, आरती करण्यात येईल. हे सर्व गणेश भक्तांना ऑनलाईन पाहता येणार आहे. मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  तसेच यावर्षी विसर्जन मिरवणुकीवरही बंदी असल्याने साध्या पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन होईल.

 हा उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थानचे पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, बापूसाहेब एकाडे, गजानन ससाणे, हरिश्चंद गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, चंद्रकांत फुलारी, रंगनाथ फुलसौंदर, प्रकाश बोरुडे, भाऊसाहेब फुलसौंदर, शिवाजी शिंदे आदि प्रयत्नशिल आहेत.

 तरी सर्व गणेश भक्तांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन शासनाच्या कोविड नियमांचे पालन करुन घरीच राहून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS