नगर -पाथर्डी येथे चोऱ्या केलेला चोरास मिरजगाव येथे अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर -पाथर्डी येथे चोऱ्या केलेला चोरास मिरजगाव येथे अटक

मिरजगाव:  नगर ,पाथर्डी तसेच जिल्हया बाहेर चोऱ्या करून मिरजगाव येथे पकडलेल्या चोराकडून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केला.  मि

साखर उद्योगात फुले 265 वाणाचे समज आणि गैरसमज
रोहित पवार – राम शिंदेंना झटका… कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Pathardi : अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त | Lok News24

मिरजगाव:  नगर ,पाथर्डी तसेच जिल्हया बाहेर चोऱ्या करून मिरजगाव येथे पकडलेल्या चोराकडून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्दे माल पोलिसांनी हस्तगत केला.  मिरजगाव बस स्थानकाजवळ संशयास्पद  फिरत असताना त्या बाबत संशय आला असता कर्जत पोलिसांना गोपनीय खबऱ्या द्वारेे  माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मिरजगाव येथे संपर्क साधून मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्थानक परिसरात  एक व्यक्ती संशयितरित्या फिरत आहे.व त्याच्याकडे चोरीचे साहित्य आहे. तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पो.हे.काँ बबन दहिफळे, पो.ना. जितेंद्र सरोदे, पो.काँ. गणेश काळाणे यांना सदर व्यक्ती ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. सदर वर्णनाचा व्यक्ती  मिरजगाव बसस्थानक परिसरात मिळून आला.  त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रमोद उर्फ नारायण काकासाहेब पठाडे, रा.जालना असे सांगितले असून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे पाथर्डी मधील चोरी केलेला एक मोबाईल, नगर मधून चोरी केलेला एक मोबाईल आणि जालना या ठिकाणी चोरी एक मोटर सायकल असा एकूण एक लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई गणेश काळाणे यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपीला माननीय न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.     सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साहेेेब अहमदनगर श्री. मनोज पाटील, मा. अपर पोलीस अधिक्षक  श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी , श्री. आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्जत पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पाटील पाथर्डी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक श्री. अमरजित मोरे, पो.हे.काँ बबन दहिफळे पो.ना. जितेंद्र सरोदे पो.काँ .गणेश काळाणे, पो.काँ. महादेव कोहक, चालक पो.काँ. शकिल बेग  यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोना जितेंद्र सरोदे हे करित आहेत.

COMMENTS