नगर तालुक्यातील 24 जणांकडून 2 कोटी होणार वसूल…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर तालुक्यातील 24 जणांकडून 2 कोटी होणार वसूल…

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन 23 संचालक व सचिव अशा एकूण 24जणांकडून संस्थेत झालेल्या अपहारापो

जामखेड शहरात अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
कोपरगाव काँगे्रसकडून कर्नाटकातील विजयाचा जल्लोष
शेतपाणंद रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन 23 संचालक व सचिव अशा एकूण 24जणांकडून संस्थेत झालेल्या अपहारापोटी 1 कोटी 98 लाख 82 हजार 881 रुपये इतक्या रकमेची व्याजासहित वसुली करण्याचे आदेश प्राधिकृत चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुधीर शेटे यांनी दिले आहेत. संबंधित संचालकांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 95 अन्वये कारवाई करून अपहाराच्या वसुलीसाठी प्राधिकृत चौकशी अधिकारी अ‍ॅड. शेटे यांनी या संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.
याबाबतची माहिती अशी की, जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत (जेऊर, ता.नगर) दि.31 मार्च 2018 अखेर 1 कोटी 39 लाख 41 हजार 184 रुपये इतक्या रकमेच्या झालेल्या अपहाराची संबंधितांवर जबाबदारी निश्‍चिती करण्यासाठी नगर तालुका उपनिबंधक के. आर. रत्नाळे यांनी अ‍ॅड. शेटे यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर व तालुका उपनिबंधक रत्नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. शेटे यांनी जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित (जेऊर) या संस्थेची कलम 88 अन्वये चौकशी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल दि. 18 ऑक्टोबर रोजी सादर केला. या अहवालात संस्थेच्या अपहार रकमेची व्याजासह वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर चौकशी अधिकारी यांनी संस्थेचे तत्कालीन 23 संचालक व सचिव यांच्यावर आरोपपत्र निर्गमित केले व या अपहारास त्यांना जबाबदार धरले. आपल्या आदेशात अ‍ॅड. शेटे यांनी अपहाराची रक्कम व्याजासह 1 कोटी 98 लाख 82 हजार 881 रुपये वसुलीचे आदेश दिले आहेत, तसेच चौकशी अधिकारी अ‍ॅड. शेटे यांनी या संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईने नगल तालुक्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

COMMENTS