श्रीरामपूर दि. ०२ (वार्ताहर) :- सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या "राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत" नगर जिल्ह्यातील ६० वर्षे
श्रीरामपूर दि. ०२ (वार्ताहर) :-
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या “राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत” नगर जिल्ह्यातील ६० वर्षे वयावरील सर्व वयोवृद्धांना मोफत सहायक साधने वाटप करण्यात येणार आहे. ही योजनेचा फायदा नगर जिल्ह्यातील सर्व वयोवृद्धांना मिळावा यासाठी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सतत पाठपुरवठा केला.
ही योजना जिल्ह्यातील प्रत्येक गरजु पर्यत पोहचविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण विभाग, अहमदनगर विशेष प्रयत्न करत आहेत.
या योजने अंतर्गत ६० वर्षे वयाच्या व वार्षिक उत्पन्न १,८०,००० पेक्षा कमी असणाऱ्या प्रत्येक जेष्ठ नागरिकास त्यांच्या गरजेप्रमाणे नंबरचा चस्मा, काठी, श्रवण यंत्र, कृत्रिम दात, कुबडया, वॉकर, व्हीलचेअर, गुडघ्याचा पट्टा, मानेचा, पाठीचा पट्टा, तीनचाकी सायकल, इत्यादी साहित्य मोफत देण्यात येणार आहे.
हे शिबीर दोन टप्यात होणार असून प्रथम टप्प्यामध्ये प्रत्येक नागरिकांचे परीक्षण करण्यात येऊन त्यास कोणते साहित्य लागेल हे ठरविण्यात येईल व एक महिण्यानंतर दुसऱ्या टप्प्यात साहित्य वाटप करण्यात येईल. प्रथम टप्पा १ ऑक्टोबर रोजी पारनेर येथून सुरु झाला असून ३ व ४ ऑक्टोबर रोजी राहुरी येथे होणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील प्रत्येक वयोवृद्धांनी फायदा घ्यावा असे आव्हान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
COMMENTS