नगरला बाॅम्ब स्फोटात दोन जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरला बाॅम्ब स्फोटात दोन जखमी

नगर तालुक्यातील नारायणडोह गावापासून दूर असणा-या वस्तीवर जाणा-या रस्त्यावर जुन्या काळातील बाॅम्बचा स्फोट झाल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.28) सांयकाळी घडली.

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत
महिला रुग्णासह रुग्णवाहिकाच पळवली.
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तातडीने शिक्षा देण्याचा स्वतंत्र कायदा करावा – बाळासाहेब सानप

 नगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील नारायणडोह गावापासून दूर असणा-या वस्तीवर जाणा-या रस्त्यावर जुन्या काळातील बाॅम्बचा स्फोट झाल्याने दोघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.28) सांयकाळी घडली.  याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील नारायणडोह येथे बुधवारी (दि.28) गावापासून दूर असणारी बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाणा-या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुमात पिन असणारा हॅन्ड ग्रेनेड मिळाला. 

दरम्यान, शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या महिलेस  बाॅम्ब गोळा सापडला. त्या महिलेने तो बाॅम्ब गोळा जवळ असणा-या मुलाकडे दिला. त्या मुलाने तो बाॅम्बगोळा जमीनीवर आपटला, यावेळी मोठा धमका झाला. यात शेतात कामावर असणारा अक्षय साहेबराव मांडे हा मुलगा व शेतमालकाची पत्नी मंदाबाई फुंदे ही दोघे जखमी झाल्या आहेत. या धमक्याचा आवाज 2 ते 3 कि.मी पर्यंत आवाज गेल्याने परिसरात घबराटीचे वातावरण झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी पोलीस पथकासह भेट दिली. यानंतर गुरुवारी घटनास्थळाची बाॅम्ब शोधक पथकाने पाहणी केली. नगर तालुका परिसरात बाॅम्ब सारखी वस्तू आढळून आल्यास हात लावू नये, याबाबत नगर तालुका पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप यांनी केले आहे.

COMMENTS