नगरमध्ये लैंगिक शोषणाचे सहा भयानक प्रकार… ; प्रदेश भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये लैंगिक शोषणाचे सहा भयानक प्रकार… ; प्रदेश भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरात महिला व मुलींच्या लैंगिक शोषणाचे सहा भयानक प्रकार घडले आहेत. यातील काही प्रकरणात पोलिसांत तक्रारी देऊनही गुन्हेच दाखल केल

दरेकरांमुळे ठाकरेंना कोकणात जावे लागले…; भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा
Parner : चित्रा वाघ यांची तहसीलदार देवरे यांना भेट ही आर्थिक देवाण-घेवाणीतून l Lok News24
चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर शहरात महिला व मुलींच्या लैंगिक शोषणाचे सहा भयानक प्रकार घडले आहेत. यातील काही प्रकरणात पोलिसांत तक्रारी देऊनही गुन्हेच दाखल केलेले नाहीत तर काही प्रकरणात गुन्हे दाखल करूनही पुढचा तपासच केलेला नाही, असा खळबळजनक दावा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी शनिवारी येथे केला. संबंधित कुटुंबांची भेट घेऊन सर्व माहिती घेतली आहे व आता पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या पिडीतांच्या व्यथा मांडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नगरमध्ये हनीट्रॅप विषय झाल्याचे माहीत आहे, पण तो वेगळा विषय आहे. येथे महिला व मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यांच्या कहाण्या ऐकून आपले हात किती तोकडे आहेत, कायदे असूनही आपण काही करू शकत नाहीत, पोलिस दखलच घेत नाहीत, हे जाणवल्याचे दुःख वाटत असल्याचे सांगून वाघ म्हणाल्या, नगरमधील असा प्रकार पाहिल्यावर राज्यातही असे प्रकार होत असतील, पोलिसांकडून महिला व मुलींवरील अन्यायाची दखल घेतली जात नसेल, त्यामुळे त्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे प्रदेश भाजपच्यावतीने यादृष्टीने आता लक्ष केंद्रीत केले जाणार आहे व त्या महिला-मुलींना मदतीचा हात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरमध्ये लैंगिक शोषणाचे सहा प्रकार घडल्याचे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनीच आपल्याला सांगितल्याने संबंधित कुटुंबांना भेटण्यासाठी आले होते. पोलिस अधीक्षक पाटील आज उपलब्ध नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पण आता त्यांची वेळ घेऊन तसेच संबंधित पिडीत महिलांना समवेत घेऊन पाटील यांच्यासमोरच या महिला व मुलींवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचणार असल्याचे सांगून वाघ म्हणाल्या, या महिला व मुलींपैकी काहींनी पोलिसांकडे तक्रारी देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. काही तक्रारी दाखल करून फक्त घेतल्या आहेत व त्यावर पुढे तपासच केलेला नाही. त्यामुळे या प्रकारांची पोलिसांकडून दखल घेतली जावी व दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांवर पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याच्या आठ तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. त्यांचा पाठपुरावा सुरू आहे, पण स्वतःच्या महिला कर्मचार्‍यांना पोलिस सुरक्षित ठेवू शकत नसल्याचे वास्तव यातून पुढे आल्याने त्याचे दुःख असल्याची भावनाही वाघ यांनी व्यक्त केली.

त्यांचा तपास होऊ तर दे…
चित्रपटसृष्टीतील पॉर्न फिल्मसंदर्भात व राज कुंद्रासंदर्भात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत वाघ यांनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत, त्यांचा तपास तर होऊ द्या, असे सांगून त्या म्हणाल्या, पण या प्रकरणाकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणात फसवल्या गेलेल्या मुलींनी आता पुढे येऊन त्यांच्यावरील अन्याय पोलिसांसमोर मांडला पाहिजे. चित्रपटसृष्टीतील पेज-थ्री क्लचरचे हे रुप भयानक आहे. पण त्यात होरपळलेल्या मुलींना मदतीचा हात आम्ही देणार आहोत, असेही वाघ यांनी सांगितले.

COMMENTS