नगरमधील सर्व दुकाने आजपासून बंद ;  फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमधील सर्व दुकाने आजपासून बंद ; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा

नगर जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसारच बंदची प्रक्रिया राबवली जाणार असून अत्यावश्यक सेवा वगळता मंगळवारपासून (6 एप्रिल) जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.

हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स ; महाराष्ट्र युवक काँग्रेसचा पुढाकार
नगरसह दहा जिल्हे उद्यापासून निर्बंधमुक्त ; सर्व व्यवहार खुले
सात मल्टीनिधी संस्थांनी गुंतवणूकदारांना फसवले…

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यामध्ये राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसारच बंदची प्रक्रिया राबवली जाणार असून अत्यावश्यक सेवा वगळता मंगळवारपासून (6 एप्रिल) जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. दरम्यान, जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाईसुद्धा केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप पोखरणा, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, डॉ. संदीप सांगळे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे तंतोतंत पालन सर्वांनीच केले पाहिजेत. हॉस्पिटल, किराणा, शेतीमाल, माल वाहतूक अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी दुकाने मंगळवारपासून बंद राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शनिवार ब रविवारी या काळामध्ये जमावबंदी व संचारबंदी लागू राहणार आहे. यावेळी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शुक्रवारी रात्रीपासून ही जमावबंदी व संचारबंदी सुरू होईल व ती सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चालेल, असे त्यांनी सांगितले तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्स तसेच मास्क वापर करावा, असेही ते म्हणाले. शासनाने अत्यावश्यक सेवा तसेच ज्या बँका व अन्य कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेले आहे, त्यासाठी नियमावली दिलेली आहे. त्या नियमावलीचे तंतोतंत पालन केले पाहिजे जर नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधित दुकान बंद करण्याचे व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचेही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्त व जिल्हा क्षेत्रांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना आरोग्य यंत्रणेबाबतचे अधिकार दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS