नगरच्या कलाकारांचा लक्ष्मीपूजनप्रसंगी सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या कलाकारांचा लक्ष्मीपूजनप्रसंगी सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम

नगर - दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनप्रसंगी गुरूवार दि.४ नोव्हेंबर २०२१ ला नगरच्या कलाकारांचा दिल्ली राष्ट्रीय दूरदर्शन आणि मुंबई राज्य दूरदर्शनच्या सह्या

घरीच थांबा, तुम्हा शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाईन’ संभाजीराजेंचं आवाहनl पहा LokNews24
प्रत्येक युनिटचे पैसे वसुल झाले नाही तर महावितरणचे अस्तित्व धोक्यात : सिंघल
सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

नगर – दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनप्रसंगी गुरूवार दि.४ नोव्हेंबर २०२१ ला नगरच्या कलाकारांचा दिल्ली राष्ट्रीय दूरदर्शन आणि मुंबई राज्य दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमामधून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचे कार्य नगरमधील सुपरिचित गायक पवन श्रीकांत नाईक आणि त्यांच्या नादब्रह्म संगीतालय विद्यार्थी वृंदांनी केले आहे. या कलाकारांनी गायलेली गाणी दिल्ली राष्ट्रीय दूरदर्शनवर दि.४ ला सायंकाळी ६ ते ७ या वेळेत तर मुंबई राज्य दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सायंकाळी ७.३३ ते ९.३३ या वेळेत प्रसारित होणार आहेत. या गाण्यांचे  ध्वनीचित्रमुद्रण मुंबईतील सह्याद्री वाहिनीच्या स्टुडिओमध्ये मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले.
                या कार्यक्रमामध्ये सुफी तत्वज्ञानावर आधारित दोन मराठी आणि एका उर्दू कव्वालीच्या रचनेचा समावेश आहे. नगर येथील प्रा.चंद्रकांत जोशी व प्रा.निलेश खळीकर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘तन मन बुद्धी आत्मनंद’ व ‘तुझ्या शोधात देवा, शोध ही आनंद वारी’ या दोन मराठी रचनांबरोबर  ‘फर्ष पे रहकर अर्ष पे जाना’, या उर्दू रचनांना गायक पवन नाईक यांनीच संगीतबद्ध केले आहे. गायक पवन नाईक यांना कल्याण मुरकुटे व पंकज नाईक (हार्मोनियम), स्मिता राणा (सतार), कुलदीप चव्हाण (बेंजो), शेखर दरवडे (तबला),  प्राजक्ता उकिर्डे (ताल वाद्य) तसेच नवरतन वर्मा, पवन तळेकर आणि श्रेयस शिंत्रे यांनी सहगायनाची साथ दिली. स्वाती दुतारे, शर्वि सर्जे, राधिका परदेशी यांनी नियोजनासाठी मदत केली. वेशभूषेसाठी पंकज शर्मा, हर्षद भावे, जान्हवी व कीर्ती आयचिते, जालिंदर शिंदे, दिपक जाधव यांनी सहकार्य केले. मुंबईतील व्यवस्थेसाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार विश्वास जाधव यांचे विशेष  सहकार्य लाभले. रवी जाधव, रवींद्र सांगळे यांनी वाहन व्यवस्था सांभाळली. छायाचित्रण व्यवस्थेसाठी हरीश बारस्कार यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमामध्ये चंद्रशेखर पणसे यांचे समूह सतारवादन तर धनंजय दैठणकर, स्वाती दैठणकर व वनिता दैठणकर यांचे संतूर नृत्य होणार आहे. बसवराज गुरव यांचे उपशास्त्रीय नृत्य सादर होणार असून प्रणव हरदास यांच्या वाद्य वृंदाचा सहभाग आहे. पवन नाईक यांना या कार्यक्रमाची आखणी करताना सर्वश्री सुरेश साळवी, कुमुदिनी बोपर्डीकर, डाॅ.मधुसूदन बोपर्डीकर, रेवणनाथ भनगडे, सतीश आचार्य, शुभांगी मांडे, शुभलक्ष्मी गुणे, रघुनाथ केसकर, विणा कुलकर्णी, शुभांगी बहुलीकर, डाॅ. विकास कशाळकर या गुरूवर्यांचे मार्गदर्शन लाभले. नगर शहर आणि जिल्ह्याच्या इतिहासात लक्ष्मीपूजनप्रसंगी दूरदर्शनवर कार्यक्रमाचे प्रसारण करण्याचा पहिला मान पवन नाईक यांच्या नादब्रह्म संगीतालयाने मिळवल्याबद्दल रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट, सरगमप्रेमी मित्र मंडळ, बंदिश, श्रृतीसंगीत निकेतन, ज्येष्ठ नागरिक मंच व संस्कार भारती या संगीत क्षेत्रातील संस्थांकडून आणि संगीत रसिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे निमित्ताने नगरकरांना नादब्रह्म संगीतालयाने अनमोल दिवाळी भेटच दिली अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक क्षेत्रामधून उमटत आहे.

COMMENTS