नंदुरबार पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता… भाजपचा धुव्वा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंदुरबार पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता… भाजपचा धुव्वा

प्रतिनिधी : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-शिवसेना आघाडीला सत्ता कायम राखण्यात यश आ

अभिनेत्री तापसी पन्नू अडकली लग्नबंधनात
नवनीत राणा जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल
किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

प्रतिनिधी : नंदुरबार

जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-शिवसेना आघाडीला सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. 

शहादा, नंदुरबार पंचायत समितीत भाजपची सत्ता असलेल्या नंदुरबार पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा तर शहादा पंचायत समितीवर काँग्रेसने आपला झेंडा फडकावला आहे.

ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या जागांसाठी जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये निवडणूक पार पडली. जिल्हा परिषदेत काँग्रेस-शिवसेना आघाडीने सत्ता कायम राखली आहे. 

तर शहादा आणि नंदुरबार पंचायत समितीमध्ये सत्तांतर झाले आहे. या दोन्ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात होत्या. शहादा पंचायत समिती काँग्रेसने वर्चस्व मिळवले आहे. तर नंदुरबार पंचायत समितीत शिवसेनेने सत्ता मिळवली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्यत्व असून पोटनिवडणुकीतील अकरा गटांपैकी काँग्रेसने ३, भाजपने ४, शिवसेनेने ३ आणि राष्ट्रवादीने १ जागेवर विजय मिळवला असून 

जिल्हा परिषदेतील ५६ जागांपैकी पक्षीय बलाबल आकडेवारीनुसार कांग्रेस २४, शिवसेना ८, भाजप २०, राष्ट्रवादी ४ असे संख्याबळ झाले आहे. यात काँग्रेस आणि शिवसेनेने ३१ सदस्यांचे संख्याबळ मिळवून सत्ता कायम राखली आहे.

COMMENTS