Homeताज्या बातम्या

ध्येयनिश्चितीसाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता : घनशाम शेलार

श्रीगोंदा : इयत्ता दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी व क्षमता ओळखून भविष्यातील ध्येय निश्चित करावे आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष घनशाम शेलार यांनी केले.  श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय  येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.“या विद्यालयातील एखादा विद्यार्थी भविष्यात मोठ्या पदावर यशस्वी झाल्यानंतर त्याचा सत्कार करण्याचा योग मला आला, तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमास श्रीगोंदा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती शहाजीराव खेतमाळीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचा सल्ला दिला तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान अनुष्का खेतमाळीस, तृष्णा यादव, वैष्णवी वराडे, प्रतीक्षा राऊत, प्रांजल खेतमाळीस व समृद्धी वराडे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळा, शिक्षकवर्ग व पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी वर्षभर घेतलेल्या परिश्रमांमुळेच आम्ही आज आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संजय आनंदकर, गोपाळराव मोटे पाटील, प्रकाश निंभोरे, सुदामराव झुंजरूक,  मोहनराव भिंताडे,  श्यामकाका खेतमाळीस, कृषी अधिकारी बोदगे, इरफानभाई शेख, मुख्याध्यापक  सुभाष जामदार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजबळ वाय. के. यांनी केले तर आभार पवार एस. एन. यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जगाला आज बंदुकीची नाही… सदभावनेची गरज : सायकल यात्रा शिबिरात डॉ. सुब्बराव यांचे प्रतिपादन
युवराज गायकवाड जातीय सलोखा जपणारे नेतृत्व : हभप वायसे महाराज
शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाईंनी केले – आमदार राजळे

श्रीगोंदा : इयत्ता दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनिवडी व क्षमता ओळखून भविष्यातील ध्येय निश्चित करावे आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष घनशाम शेलार यांनी केले.  श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय  येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.“या विद्यालयातील एखादा विद्यार्थी भविष्यात मोठ्या पदावर यशस्वी झाल्यानंतर त्याचा सत्कार करण्याचा योग मला आला, तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमास श्रीगोंदा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती शहाजीराव खेतमाळीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचा सल्ला दिला तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान अनुष्का खेतमाळीस, तृष्णा यादव, वैष्णवी वराडे, प्रतीक्षा राऊत, प्रांजल खेतमाळीस व समृद्धी वराडे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळा, शिक्षकवर्ग व पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी वर्षभर घेतलेल्या परिश्रमांमुळेच आम्ही आज आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर संजय आनंदकर, गोपाळराव मोटे पाटील, प्रकाश निंभोरे, सुदामराव झुंजरूक,  मोहनराव भिंताडे,  श्यामकाका खेतमाळीस, कृषी अधिकारी बोदगे, इरफानभाई शेख, मुख्याध्यापक  सुभाष जामदार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजबळ वाय. के. यांनी केले तर आभार पवार एस. एन. यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS