Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळोबा डोंगरावर ट्रेकिंग करताना व्यावसायिक सुहास पाटील यांचा मृत्यू

कराड / प्रतिनिधी : कराडातील सायकलपटू व उत्तम ट्रेकर, गुळाचे अडत व्यापारी सुहास शामराव पाटील (वय 52) यांचे घारेवाडीचा धुळोबा डोंगरात ट्रेकींग करता

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या : श्रीकांत देशपांडे
महाबळेश्‍वर तहसिल कार्यालयाच्या परिसरात पांढर्‍या शेकरूचे दर्शन
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

कराड / प्रतिनिधी : कराडातील सायकलपटू व उत्तम ट्रेकर, गुळाचे अडत व्यापारी सुहास शामराव पाटील (वय 52) यांचे घारेवाडीचा धुळोबा डोंगरात ट्रेकींग करताना हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. रविवार, दि. 17 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
घारेवाडी येथे असलेला धुळोबा डोंगरावर सात ट्रेकर्स जात होते. यावेळी सुहास पाटील यांना हृदयाचा तीव्र धक्का बसला. त्यांच्या सोबतच्या ट्रेकर्सनी प्रंसगावधान राखून त्यांना डोंगरातून खाली आणले. शहरातून मदतीला आलेल्या ट्रेकर्सच्या मदतीने सुहास पाटील यांना रूग्णालयात हलवले. मात्र, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी पाटील यांचे निधन झाले.
सुहास पाटील हे मार्केट यार्डातील गुळाचे अडत व्यापारी म्हणून शहरात प्रसिध्द होते. उत्तम ट्रेकर्स व सायकलीस्ट म्हणून ते शहरात परिचित होत. त्यांनी वैष्णवदेवी ते श्रीखंड कैलास सायकलने प्रवास केला आहे. नवरात्रीत साकलवरून कोल्हापूरला ते आंबाबाईच्या दर्शनाला जावून आले होते. त्यांनी परिसरातील अनेक गड व डोगरात ट्रेकींग पूर्ण केले आहे. त्यासह कराड ते वैष्णोदेवी व पुन्हा कराड अशी चालत परिक्रीमा यात्रा यशस्वी पूर्ण केली होती. कराड ते रायगड, कराड ते कोल्हापूर सायकल ट्रेक पूर्ण केला आहे. श्रीखंड कैलास खडतर यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केला. आज सकाळी धुळोबा डोंगरात ट्रेकिंगच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच शहरात व्यापारी व ट्रेकर्सना धक्का बसला.

COMMENTS