धारावीत गॅस सिलेंडर स्फोटात १५ जण होरपळले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारावीत गॅस सिलेंडर स्फोटात १५ जण होरपळले

मुंबई : धारावी परिसरात आज दुपारी झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटात सुमारे १५ जण होरपळले असून त्यातील १० जण किरकोळ जखमी, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. य

काश्मिरातील पुलवामात बोट बुडाली
मनीष सिसोदियांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी
कर्नाटक येथील तरुणाच्या हत्तेच्या निषेधार्थ आंदोलन | LOKNews24

मुंबई : धारावी परिसरात आज दुपारी झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटात सुमारे १५ जण होरपळले असून त्यातील १० जण किरकोळ जखमी, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. यात तिघांचे चेहरे भाजले असून त्यात आठ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सायन रुग्णालयात जाऊन स्फोटातील जखमींची विचारपूस केली.

धारावी-माटुंग्याच्या दरम्यान शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही दुर्घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी १२.३० च्या सुमारास एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन फायर इंजिन आणि एका जेटीच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींवर उपचार करणाऱ्या डॉ. सायली यांनी सांगितले की, एकूण १५ जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १० जण किरकोळ भाजले आहेत. तर पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील दोघे जण ५० ते ६० टक्के भाजले आहेत. तसेच तीन जणांचे चेहरे भाजले आहेत. यात एका आठ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. गंभीर भाजलेल्या या पाचही जणांमध्ये ८ ते ५८ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे.

गॅस सिलिंडरचा स्फोट होताच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये एकच तारांबळ उडाली. दरम्यान आगीत काही जण होरपळल्याने स्थानिकांचा एकच आक्रोश सुरू झाला. तसेच आग विझवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. यावेळी काही लोकांनी आगीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ आग नियंत्रणात आणली.

COMMENTS