धक्कादायक… एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या… कारण…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक… एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या… कारण…

प्रतिनिधी : अहमदनगरकेडगाव उपनगरातील अर्थवनगरमध्ये राहत्या घरात पती-पत्नीसह अल्पवयीन मुलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. आज सकाळी

संगमनेर बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर
क्रिकेट सट्टयात गमावलेले पैसे चुकविण्यासाठी दागिन्यांची चोरी
मुळा धरणाकडे जाणार्‍या रस्त्याचे भाग्य उजळणार

प्रतिनिधी : अहमदनगर
केडगाव उपनगरातील अर्थवनगरमध्ये राहत्या घरात पती-पत्नीसह अल्पवयीन मुलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत.

आज सकाळी ही घटना उघडकीस आली. संदीप दिनकर फाटक (वय- 42), किरण संदीप फाटक (वय- 32) व त्यांची मुलगी मैथाली संदीप फाटक (वय- 12) असे मयत तिघांचे नावे आहेत.

स्थानिकांनी कोतवाली पोलिसांना कळविल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे.

पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतले आहे. व्यवसायिक कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा त्यामध्ये उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फाटक कुटुंबाचा किराणा मालाचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

COMMENTS