बीड : आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज बारा
बीड : आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील राक्षसभुवन येथे आज बारा वाजता घडली. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये स्नेहा धर्मराज कोरडे (वय १९) आणि अमृता धर्मराज कोरडे (वय ८) या चिमुकल्या दोन मुलांचा समावेश आहे. अवैध वाळू उपशामुळे गोदावरी पात्रात मोठमोठे खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही दुर्दवी घटना घडली, धुणे धुण्यासाठी आज दुपारी वाजता आई सोबत स्नेहा आणि अमृता या दोघी सख्ख्या बहिणी गोदावरी पात्रात गेल्या होत्या. आई धुणे धुण्यात व्यवस्त असताना दोन्ही सख्याख्या बहिणी पाण्यात उतरल्या आणि त्यात बुडून त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती चकलांबा पोलीसांना होताच एपीआय भास्कर नवले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत दोन्ही मृतदेह बाहेर काढले.
COMMENTS