दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठ

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉप शॉपच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

वापरलेले पिपीई किट कचरा कुंडीत टाकल्याने 1 लाखाचा दंड
बुलडाण्यात शेतकऱ्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न | LOKNews24
‘एक देश एक निवडणूक’वरून संसदेत गोंधळ ; लोकसभेत विधेयक मांडले

पुणे/प्रतिनिधी : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाने दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना कॉप शॉपच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली. तसेच शेतकऱ्यांना दहा हजार टन खतांचा रास्त दराने पुरवठा केला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेला कृषी माल राज्यातील दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळाली बाजारपेठ आणि कृषी प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम महामंडळांच्यामार्फत करण्यात आले. 

त्याचबरोबर पावणेदोनशे कृषी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात दहा हजार टन खतांचा पुरवठा करण्यात आला. महामंडळाने गेल्या वर्षभरात दीड लाख रुपयांचा नफा कमावला. तसेच, राज्यात कृषी उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सूक्ष्म व लघु उद्योगांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन सेवा पुरविण्यात येणार असून, पर्यटन समन्वयक म्हणून ही काम करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सहकार विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.

COMMENTS