देशात एकाच दिवशी 79 लाख लोकांचे लसीकरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात एकाच दिवशी 79 लाख लोकांचे लसीकरण

नवी दिल्ली: भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून नवा विक्रमही प्रस्थापित केलाय. देशात आज, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार
रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाला पूर्णविराम
सोमैया महाविद्यालयात राष्ट्रपिता व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात

नवी दिल्ली: भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून नवा विक्रमही प्रस्थापित केलाय. देशात आज, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 79 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली.

देशात 21 ते 27 ऑगस्ट या आठवड्यात देशातील 4.5 कोटी नागिरकांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील आतापर्यंतचा उच्चांक आहे. ऑगस्ट महिन्यात लसीकरणाचा उच्चांक गाठण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात 15 कोटीहून अधिक कोरोनावरील लसीचे डोस देऊन लसीकरणाचा विक्रम गाठला आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अजून दुसऱ्या लाटेचा कहर काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे केंद्र सरकारचा जोर आहे. देशात गेल्या दोन दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे केरळमध्ये वाढलेली रुग्णसंख्या. केरळमध्ये सध्या दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये काल एकाच दिवशी तब्बल 30 हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर 162 जणांना जीव गमवावा लागला.

COMMENTS