अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, देशभर कठोर टाळेबंदी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे देशभर टाळेबंदी करण्यात आली होती तशी होणार नाही, असे स्पष्ट केले.
नवीदिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, देशभर कठोर टाळेबंदी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे देशभर टाळेबंदी करण्यात आली होती तशी होणार नाही, असे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर कोरोना नियंत्रणासाठी पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक बँकेच्या बँकेच्या प्रमुखांशी सीतारामन यांनी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी अर्थ मंत्रालयाने पावले उचलली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. कोरोनाचा कहर वाढत असला, तरी पूर्णपणे टाळेबंदी करून अर्थव्यवस्था ठप्प करण्याचा कोणताही विचार नाही, असे त्या म्हणाल्या. स्थानिक पातळीवर कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणसारखे पर्याय देऊन कोरोना नियंत्रणासाठी उपाय केले जातील. अर्थ मंत्रालयाने कोरोना नियंत्रणासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँकेने अतिरिक्त कर्ज देण्याच्या निर्णयाचे सीतारामन यांनी स्वागत केले.
COMMENTS