देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्यावतीने वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. भारताचे
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या श्री त्रिंबकराज मोफत वाचनालयाच्यावतीने वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष श्री सत्यजित पाटील कदम म्हणाले की दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन, आणि दिलदार स्वभाव या गुणांमुळे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी देशातील युवा पिढीला आपल्या विचारांनी भारावून टाकले म्हणून आज प्रत्येक युवक त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.15 ऑक्टोबर या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन संस्कृती जोपासण्यात यावी व तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथपाल श्री संभाजी वाळके यांनी तरुणांना पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत पुस्तके देऊन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे,नगरसेवक शिवाजीराव मुसमाडे , बाळासाहेब खुरुद, डॉ. अजिंक्य कदम, मुख्याधिकारी श्री अजित निकत विभाग प्रमुख बन्सी वाळके, स्थापत्य अभियंता, सुरेश मोटे, लेखापाल , कपिल भावसार, ग्रंथपाल संभाजी वाळके, मुन्ना कांबळे ,श्री भास्कर जाधव श्री भाऊसाहेब पठारे, सारंगधर टिक्कल, सुभाष कुलट ,तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
COMMENTS