दूध उत्पादकांचा येवला पैठणी देऊन सन्मान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध उत्पादकांचा येवला पैठणी देऊन सन्मान

अकोले/प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील मोग्रस येथील मुळमाता सहकारी दूध उत्पादक व व्यवसायिक संस्था मर्यादित मोग्रस या संस्थेने महिला दूध उत्पादकांचा ’येव

कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
शिर्डी उपविभागातील 16 गुन्हेगार तडीपार
सह्याद्री व्हॅली स्कूल किलबिलाने बहरली

अकोले/प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील मोग्रस येथील मुळमाता सहकारी दूध उत्पादक व व्यवसायिक संस्था मर्यादित मोग्रस या संस्थेने महिला दूध उत्पादकांचा ’येवला पैठणी ’देऊन अनोखा सन्मान केला. याप्रसंगी मोग्रस गावचे भूमिपुत्र सहकार महर्षी श्री सिताराम पाटील गायकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर यावेळी दादा पाटील बाबुराव गोडसे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. माजी सभापती भानुदास पाटील गायकर. मोग्रस गावच्या सरपंच ज्योतीताई किरण गायकर गावच्या पोलीस पाटील, सविताताई अनिल गायकर, मोग्रस सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब बाबुराव थटार, आदी मान्यवर व संचालक, दूध उत्पादक व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी सर्वाधिक दूध घालणार्‍या दूध उत्पादकांचा सन्मान करण्यात आला.

मोग्रस गावच्या नावलौकिकासाठी प्रयत्न करू : सीताराम पाटील गायकर
या पुढील काळात ही आपण सर्वांनी मोग्रस गावचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करू या. कोणत्याही गावाचा विकास करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे. असे सांगत या दूध संस्थेमध्ये अनेकांचा मोलाचा आणि खारीचा वाटा आहे त्यामुळेच आज ही संस्था नावारूपाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहेअसे यावेळी अगस्ती कारखान्याचे व व्हाईस चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन चहादु गोडसे यांनी केले. चेअरमन नारायण रघुनाथ थटार यांनी स्वागत करून उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS