दुसर्‍या लाटेची पुन्हा एकदा उसळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुसर्‍या लाटेची पुन्हा एकदा उसळी

कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ, तसेच अभ्यासकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे.

गेम चेंजर महिला नेत्या !
दिव्यांग म्हणजे सकारात्मकता ऊर्जा स्रोत, दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासन सदैव तत्पर:-  मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल
सिंदी शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा 

मुंबई/प्रतिनिधीः कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ, तसेच अभ्यासकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे. रुग्णसंख्येमध्ये झालेले राज्यातील व मुंबईतील चढउतार पाहता ही तिसर्‍या लाटेची सुरुवात आहे का, असा प्रश्‍न सामान्यांच्या मनात येत आहे; मात्र ही तिसर्‍या लाटेची सुरुवात नसून, खाली जात असलेल्या दुसर्‍या लाटेने पुन्हा वर घेतलेली उसळी असल्याचे वैद्यकीय निरीक्षण डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. 

कोरोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अनिल वेल्हे म्हणाले, ’’जगभरात कोरोना संसर्गाच्या चढउताराचा प्रकार पाहिला, तर खाली जात असताना एखादी लाट पुन्हा उसळी मारते व रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ होते. भारतामध्येही हा प्रकार होताना दिसतो.’’ आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, की नीती आयोगाने तिसरी लाट डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत येईल, असे भाष्य केले आहे; मात्र आता या स्थितीमध्ये तिसरी लाट केव्हा येईल, हे ठामपणे सांगता येणार नाही. राज्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये थोडी वाढ झालेली दिसून येते. त्याला वैद्यकीय भाषेत ’सर्ज’ असे म्हणतात. मागील पंधरा दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध सैल करण्यात आले. पर्यटनस्थळांवर झालेली गर्दी, नियमांचे पालन न करणे, मुखपट्टी न लावणे यामुळेही रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. रुग्णसंख्येची वाढ नेमकी कोणत्या भागांमध्ये आहे, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. ’मुंबईमध्ये एक हजार रुग्ण दररोज वाढत आहेत. दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही हे यावरून दिसते. राज्यामध्ये दररोज नवीन दहा हजार रुग्ण आढळत आहेत. आता डेल्टा संसर्गही दिसून येत आहे. अल्फा, डेल्टा, गामा हे विषाणूसंसर्गाचे प्रकार दिसून येत आहेत. म्युटेशन बदलत असल्यामुळे रुग्णसंख्या पुढील काळात रुग्णसंख्या किती वाढते,’ याकडेही लक्ष देण्याची गरज डॉ. सुपे यांनी व्यक्त केली.

COMMENTS