Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्देवी ! शेळीचा जीव वाचवताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू .

दुर्देवी ! शेळीचा जीव वाचवताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू

 अक्कलकोट - सोलापूर रस्त्यावरील चाचा ढाब्याजवळ वादळ वाऱ्यात तुटून पडलेल्या विद्युत तारेला चिटकून तडफडणाऱ्या शेळीचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा

एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल
बस १०० फूट उंचावरुन नदीत कोसळली.
‘या’ महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी

 अक्कलकोट – सोलापूर रस्त्यावरील चाचा ढाब्याजवळ वादळ वाऱ्यात तुटून पडलेल्या विद्युत तारेला चिटकून तडफडणाऱ्या शेळीचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय . अंबादास कोरे (Ambadas Kore) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंबादास हा नेहमीप्रमाणे जनावरे घेऊन चारण्यासाठी गेला होता . यावेळी विजेचा धक्का लागलेल्या तडफडणारी शेळीचा मृत्यू त्याला पहावाला गेला नाही. त्याने तात्काळ शेळीच्या शरीरावरील विजेच्या तारा उघड्या हाताने बाजूला सारून शेळीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने यात विजेचा शॉक लागून त्याचाच मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण अक्कलकोट(Akkalkot) तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जातं आहे. याबाबत अक्कलकोट तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

COMMENTS