दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल

कर्जत प्रतिनिधी कर्जत येथे खडी फोडण्याची मशीन विकत घेण्यासाठी ६ लाख रुपये दुकान मालकाला पाठवले. मात्र मशिन किंवा पैसेही परत दिले नसल्याने दुकान मा

उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी
कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत

कर्जत प्रतिनिधी

कर्जत येथे खडी फोडण्याची मशीन विकत घेण्यासाठी ६ लाख रुपये दुकान मालकाला पाठवले. मात्र मशिन किंवा पैसेही परत दिले नसल्याने दुकान मालकाविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, देवीदास भिवा खरात, वय ५०, रा. कर्जत यांनी खडी फोडण्याची मशीन विकत घेण्यासाठी नंदिनी इंजिनिअरींगच्या कोटेशनवर दिलेल्या अकाऊंटवर ६ लाख रुपये आरटीजीएस करून पाठविले. त्यांनी दुकान मालक विजय देवराम पवार, रा. नाशिक याला फोन करून पैसे पाठवले आहेत असे सांगितले. 

त्यांनीही पैसे आल्याचे सांगितले. मात्र विजय पवार यांनी मशीनही नाही दिली आणि पैसे पण परत दिले नाही. फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच खरात यांनी कर्जत पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध कलम ४०६, २० प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.

COMMENTS