‘दि चँपियन ऑफ दि चेंज’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा सत्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘दि चँपियन ऑफ दि चेंज’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा सत्कार

भाळवणी (प्रतिनिधी):-राज्याच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष व आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांना मुंबईमध्ये राज्यपालांच्या हस्त

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचा दहीहंडी उत्सव रद्द ः आ. आशुतोष काळे
डिग्रस येथील चौकास त्यागमूर्ती रमाई आंबेडकर नाव द्यावे
वंश परंपरागत हक्क अबाधित न राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पुजार्‍यांचा इशारा

भाळवणी (प्रतिनिधी):-
राज्याच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष व आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांना मुंबईमध्ये राज्यपालांच्या हस्ते ‘दि चॅम्पीयन ऑफ दि चेंज’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाळवणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्काराबद्दल सविस्तर माहिती तसेच आदर्शगाव योजनेसंदर्भात सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अशोक (बबलू ) रोहोकले, प्रगतशील शेतकरी रंगनाथ रोहोकले, उद्योजक बाबूशेठ रोहोकले, वैभव फूड्सचे संचालक संदीप रोहोकले, पत्रकार संपत कपाळे व प्रमोद जोशी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

COMMENTS