दिवाळी निमित्त वृद्धाश्रमात आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळी निमित्त वृद्धाश्रमात आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप

नेवासाफाटा(प्रतिनिधी) दिवाळी सणाचे औचित्य साधून नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धाची आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप करण्या

LokNews24 l बेधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवले
कुंकूलोळ कुटुंबियांनी उभारले स्वखर्चातून बस निवारा शेड
शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये लगीनघाई सुरू l पहा LokNew

नेवासाफाटा(प्रतिनिधी)

दिवाळी सणाचे औचित्य साधून नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धाची आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.नेवासा येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.सौ.मनिषा वाघ यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.मनिषा वाघ हया होत्या.वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर,वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण,पत्रकार बाळासाहेब देवखिळे सौ.पोतदार,व्यवस्थापक संतोष मगर,सौ.ज्योतीताई मगर यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ.मनिषा वाघ यांनी या अगोदर हिमोग्लोबिन तपासणी केलेल्या रक्त वाढीसाठी वृद्धांना टॉनिक बाटल्यांचे तसे विविध व्याधींवरील औषधांचे वाटप पत्रकार सुधीर चव्हाण व डॉ.मनिषा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.मनिषा वाघ म्हणाल्या की वृद्धाश्रमामधील दिवाळी गोड व्हावी म्हणून दानी व्यक्तींनी या वृद्धाश्रमाला व नियोजित जागेसाठी आर्थिक हातभार लावून मदत करावी असे आवाहन केले वृद्धांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी मी देखील वाघ हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत राहील अशी ग्वाही दिली.

दिवाळीच्या निमित्ताने डॉ. मनिषा वाघ यांच्या हस्ते वृद्धांना चिवडा लाडूंचे व वृद्ध महिलांना दिवाळीच्या निमित्ताने साडयांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे वृद्धांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगून दात्यांना धन्यवाद देत वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी आभार मानले.

COMMENTS