दिवाळीच्या आनंदपर्वाला उत्साहात झाली सुरुवात ; वसुबारस पूजा उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीच्या आनंदपर्वाला उत्साहात झाली सुरुवात ; वसुबारस पूजा उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाचे सावट हळूहळू दूर होत असताना प्रकाशाचा सण असलेल्या दीपोत्सवाला म्हणजेच दिवाळीला सोमवारपासून (1 नोेव्हेंबर) उत्साहात सुरुवा

संगमनेरमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात लोकसेवा विकास आघाडी आक्रमक
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनाचे सावट हळूहळू दूर होत असताना प्रकाशाचा सण असलेल्या दीपोत्सवाला म्हणजेच दिवाळीला सोमवारपासून (1 नोेव्हेंबर) उत्साहात सुरुवात झाली. शहर परिसरातील गोशाळांसह ठिकठिकाणी वसुबारसनिमित्ताने गाय-वासरांच्या पूजा सुवासिनींनी केली. यंदाची दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात आली आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासूनच वातावरणात उत्साह आहे. सोमवारी वसुबारस पूजा झाल्यानंतर मंगळवारी (2 नोव्हेंबर) धनत्रयोदशी असून, गुरुवारी (4 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजन, शुक्रवारी (5 नोव्हेंबर) पाडवा व शनिवारी (6 नोव्हेंबर) भाऊबीज आहे. या सणांच्या प्रकाश पर्वाला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. दीन दीन दिवाळी गाय-म्हशी ओवाळी म्हणत वासरासह गायीची विधिवत पूजा केली गेली. प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशाची उधळण करणारा सण म्हणून दिवाळीच्या सणाकडे पाहिले जाते. वसु बारसची पूजा करून दिवाळी सणाच्या उत्सवाला सुरुवात झाली. येथील अरुणोदय गोशाळा येथे गाई वासराची पूजा पार्वतीबाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी छायाताई गुंदेचा, नगरसेविका शितल जगताप, अ‍ॅड. पूजा गुंदेचा, शिल्पा फुलडाहाळे, अर्चना गांधी, श्‍वेता गुंदेचा, पूजा बोरा, मीना बोरा, कीर्ती बोरा, साक्षी बोरा, वैभवी फुलडाहाळे, पूजा गाडळकर, मनीष फुलडाहाळे आदी उपस्थित होते.दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांनीही घरी गाय-वासराची पूजा केली. तसेच नगर शहरात अनेकजण गायींचे पालन करतात. त्यांच्याही कुटुंबियांनी गाय-वासराची पूजा केली.

COMMENTS