दिल्लीत गॅंगवॉर भडकले… भरदिवसा कोर्टात कुख्यात गुन्हेगाराचा एन्काउंटर

Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत गॅंगवॉर भडकले… भरदिवसा कोर्टात कुख्यात गुन्हेगाराचा एन्काउंटर

प्रतिनिधी : दिल्ली देशाची राजधानी नवी दिल्लीत न्यायालयातच गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील रोहिणी न्यायालयातच गोळीबार झाल्याची थरारक घ

वाचन संस्कृती वाढविणे आणि प्रतिष्ठित करणे गरजेचे : डॉ. बाबुराव उपाध्ये
 वाळूज औद्योगिक नगरीतील जी सेक्टर मधील अनिल पॅकेजिंग कंपनीला भीषण आग
अनपेक्षित निकाल, पण इंडिया आघाडीला फायद्याचा!

प्रतिनिधी : दिल्ली

देशाची राजधानी नवी दिल्लीत न्यायालयातच गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील रोहिणी न्यायालयातच गोळीबार झाल्याची थरारक घटना घडली. 

या गोळीबारात हल्लेखोरांचाही मृत्यू झाला, तर एक गँगस्टरही ठार झाला आहे. भर दुपारी आरोपींनी वकिलाचा वेश परिधान करुन कोर्टात प्रवेश करत गोळीबार केला होता.

फिल्मी स्टाईलने हल्लेखोरांनी मोस्ट वॉन्टेड गुंड जितेंद्र उर्फ गोगीची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाले. 

या गोळीबारात आतापर्यंत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिलांच्या रूपात न्यायालय परिसरात घुसले होते. 

त्यांनी गुंड जितेंद्रवर गोळीबार केला. स्पेशल सेलच्या टीमने जितेंद्रला कोर्ट रूममध्ये नेले होते. तिथे हा थरारक प्रसंग घडला. 

दिल्लीच्या टिल्लू टोळीने जितेंद्रची हत्या केल्याचा संशय आहे. जे हल्लेखोर ठार झाले आहेत त्यातील एकाचं नाव राहुल आहे, ज्याच्यावर ५० हजारांचे बक्षीस होते. तर दुसराही वॉन्टेड गुंड होता.

COMMENTS