दिलासादायक; नाशिक जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७३३ ने घट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिलासादायक; नाशिक जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७३३ ने घट

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ४९४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४७ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आईच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देऊ शकल्याने 14 वर्षीय मुलाची आत्महत्या | LOK News 24
क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा स्मृतीस्तंभ उभारणार : निरंजन डावखरे
गणपती उत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार ४९४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४७ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ७३३ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. 

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण : नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ७१२, चांदवड १ हजार ७३९, सिन्नर २ हजार ६५, दिंडोरी १ हजार ४१७, निफाड ३ हजार ६२८, देवळा १ हजार ३०७, नांदगांव ९३९, येवला ७८३, त्र्यंबकेश्वर ४७०, सुरगाणा ३६९, पेठ २००, कळवण ८३६, बागलाण १ हजार ६६८, इगतपुरी ३९८, मालेगांव ग्रामीण ८३७ असे एकूण १८ हजार ३६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७ हजार ४०१ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७५८ तर जिल्ह्याबाहेरील ३११ असे एकूण ४७ हजार ८३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ०३ हजार ६७७ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.५७ टक्के, नाशिक शहरात ८४.३३ टक्के, मालेगाव मध्ये ८२.१६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.२८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३६ इतके आहे.

मृत्यु : नाशिक ग्रामीण १ हजार ५२० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४९१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३७ व जिल्हा बाहेरील ९७ अशा एकूण ३ हजार ३४५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. लक्षणीय : ३ लाख ०७ हजार ६७७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ५६ हजार ४९४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४७ हजार ८३८ पॉझिटिव्ह रुग्ण. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३६ टक्के.

COMMENTS