दहशतादी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहशतादी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवून आणण्याचा एक मोठा दहशतवादी घट सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला.

भाजपसोबत कोणताही समझोता नाही – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
रस्त्यावरचा अपघात !
शिवसेनेने सत्तेसाठी भाजपचा विश्वासघात केला : केशव उपाध्ये (Video)

श्रीनगरः जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवून आणण्याचा एक मोठा दहशतवादी घट सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात मोठ्या प्रमाणात आयईडी जप्त करण्यात आले आहेत. कोणत्याही नुकसानीशिवाय ही स्फोटके निष्क्रिय करण्यात बॉम्बविरोधी पथकाला यश मिळाले. 

रेल्वे रोड डोगरी पोरा भागाला पंजगाम गावाला जोडणार्‍या रस्त्याच्या बाजूला आयईडीसारख्या वस्तू सापडल्याची गुप्त सूचना सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर अवंतीपोरा पोलिस, लष्कराची 55 राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 185 बटालियनच्या संयुक्त टीमने या भागाला घेराव घातला. नागरिकांना सुरक्षितता सुनिश्‍चित करून ही स्फोटके ताब्यात घेण्यात आली. तपासादरम्यान 10 लीटर क्षमतेचा एक संशयित कंटेनर सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागला होता. यामध्येच, आयईडी भरण्यात आल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी हे आयईडी घटनास्थळीच निष्क्रिय करण्यात आले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. आयईडीचा स्फोट झाला असता तर या भागातील अनेक रहिवाशांना आपले प्राण गमवावे लागले असते. या प्रकरणी अवंतीपोरा पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, अशी घटना दोन आठवड्यांपूर्वीही घडली होती. दक्षिण पुलवामा जिल्ह्यात दहा किलोची स्फोटके जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ’जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेकडून हा कट रचण्यात आला होता.

COMMENTS