दत्तक विधानाच्या जाहिराती  करणारांविरुद्ध गुन्हे होणार

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

दत्तक विधानाच्या जाहिराती करणारांविरुद्ध गुन्हे होणार

बालकांच्या दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महिला व बालअपराध प्रतिबंध विभागाने दिले आहेत.

राशीनमध्ये 710 किलो गोमांससह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
चांदवड देवळाचे आमदार राहुल आहेर यांची अगस्ती आश्रमास भेट
गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी- बालकांच्या दत्तक विधानाबाबत बेकायदेशीर जाहिराती करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महिला व बालअपराध प्रतिबंध विभागाने दिले आहेत. अशा पद्धतीने दिशाभूल करणारांची माहिती अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागास कळवण्याचे आवाहन संबंधित शाखेच्या प्रभारी अधिकार्‍यांनी केले आहे.

कोविड-19 मुळे आई-वडील व पालक मृत पावलेल्या बालकांना दत्तक देण्याच्याबाबत अवैधरित्या, बेकायदेशीरपणे जाहिराती समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशा बातम्या प्रसारित करणे अथवा समाजमाध्यमांद्वारे त्याची प्रसिद्धी करणे बाल हक्क संरक्षण कायदा 2015 च्या विरोधी आहे. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे जाहिराती देणार्‍या आणि अशी अवैध कामे करणार्‍यांविरोधात गुन्हे नोंदविण्यासंदर्भात महिला व बालअपराध प्रतिबंध विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी सर्व पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे या अनुषंगाने अशा दिशाभूल करणारांची माहिती अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागास कळवण्याचे आवाहन संबंधित शाखेच्या प्रभारी अधिकार्‍यांनी केले आहे. कोविड केंद्रामध्ये असलेल्या महिलांचे संरक्षण तसेच कोरोनाने आई-वडिलांचे निधन झाले आहे, अशा बालकांच्या हक्कांचे संरक्षण व अशा बालकांना बेकायदेशीर प्रकारे दत्तक देण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने कार्यवाहीच्यादृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS