दक्षिण नगर जिल्ह्यातील राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील रस्ते आता दुरुस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- दक्षिण नगर जिल्ह्यातील राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील रस्ते आता दुरुस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यांसाठी केंद्र सरकारने 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी 84 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती ते म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव ते चांदेगाव रोड साठी 4 कोटी 91 लाख, खरशिंदें ते मांजरी रोड साठी 3 कोटी 94 लाख, वरशिंदे ताराबाद ते मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी 73लाख असे एकूण 11 कोटी 59 लाख रुपयाचे रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. शेवगाव तालुक्यातील खानापूर ते ठाकूर निमगाव रोडसाठी 2 कोटी 73 लाख, पाथर्डी तालुक्यातील धमनगाव, मढी ते कोरडगाव, मालेगाव रस्त्यासाठी 12 कोटी 88 लाख, पारनेर तालुक्यासाठी गोरेगाव डीसाळ लोणी हवेली, शहांजापूर सुपा रस्त्यासाठी 3कोटी 98 लाख, कर्जत तालुक्यातील अरणगाव, वाळकी, देऊळगाव खांडवी रुईगव्हान,कुलधरण,बरडगाव सुद्रीक ते राज्य महामार्ग-54 रस्त्यासाठी 3 कोटी 95 लाख, श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग-161 ते काष्टी, मांडवगणच्या रस्त्यासाठी 12 कोटी 65 लाख असे एकूण 84 कोटी 76लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे आपण नगर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करतो, असे सांगून जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत केंद्र सरकारचा निधी पोहोचेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
COMMENTS