त्या’ चिमुरड्याच्या खून जन्मदात्या आईकडूनच?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या’ चिमुरड्याच्या खून जन्मदात्या आईकडूनच?

नेवासा/तालुका प्रतिनिधी- माता न तू वैरिणी…म्हणण्यासारखी दुर्दैवी घटना नेवासे तालुक्यात घडली आहे. आईनेच दहा वर्षाच्या आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्

मलिकांनंतर कुणाचा नंबर? सोमय्या म्हणतात चिट्ठी टाकावी लागेल | LOKNews24
भारत-जपान संबंध आणि शिंजो आबे
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा 

नेवासा/तालुका प्रतिनिधी- माता न तू वैरिणी…म्हणण्यासारखी दुर्दैवी घटना नेवासे तालुक्यात घडली आहे. आईनेच दहा वर्षाच्या आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मुलाच्या मृत्यूबद्दल फारसे दुःख वाटत नसलेल्या या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी ती सतत वेगवेगळे जबाब देत आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला मुलाच्या खुनात अटक केली असून, न्यायालयाने दिला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, नेवासे तालुक्यातील रामडोह येथे मंगळवारी (दि.6) पाटचारी रस्त्याच्या कडेला दगडाने डोके ठेचून छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत दहा वर्षीय मुलाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. याप्रकरणी नेवासा पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना चोवीस तासात मुख्य खुन्याचा तपास लावण्यात यश आल्याचे सांगितले जाते. जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी त्या मुलाच्या आईला अटक केली आहे. सुरुवातीला घटना घडल्यापासून पोलिसांसह ग्रामस्थांना या निर्घृण हत्येबाबत त्याच्या सावत्र बापावर संशय होता. मात्र, आईच्या नाटकी व संशयास्पद वर्तनामुळेच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. प्रारंभी मुलाचा मृतदेह पाहून नाटकी टाहो फोडणार्‍या आईने तपासादरम्यान पोलिसांची चांगलीच दिशाभूल केली. तिने अनेकांवर संशय घेतले. पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान, तपासात मिनिटा-मिनिटाला दिशाभूल करणारी माहिती ती पोलिसांना देत असल्याने पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला आणि तिने रचलेल्या कुभांडामुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकली. सोहमची हत्या त्याची आई सीमा उत्तम खिलारे (वय 32, रा. वरखेड, ता. नेवासे) हिनेच केल्याचा पोलिसांना संशय आहे. नेवासे पोलिसांनी सीमाला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

त्याच्या मृत्यूने हळहळ
सोहम आपल्या आईसह सावत्र वडिलांकडे राहत होता. तो गेल्या आठ-नऊ वर्षांपासून आपले दोन भाऊ व आईसह सावत्र वडिलांसमवेत वरखेड येथे वास्तव्यास होता. तो आपली पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी गावात भाकरी मागत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याचा स्वभाव खूपच गरीब होता. तो नेहमी भीतीच्या सावटात वावरत असल्याचेही ग्रामस्थ म्हणतात. त्यामुळे त्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्याचे वृत्त समजल्यावर ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. त्याची हत्या नेमकी कोणी व का केली याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी अनेकांची चौकशी केली व आता या बालकाच्या आईला पकडले असून, तिनेच आपल्या मुलाला संपवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिस तपासात नेमके काय बाहेर येते, याची उत्सुकता आहे.

वरखेड येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या करण्याच्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आईनेच मुलाचा खून केल्याचा संशय बळावला आहे. सोहम खिलारे हत्याप्रकरणी त्याची आई सीमा हिला अटक केली आहे. यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास चालू आहे.
विजय करे, पोलिस निरीक्षक, नेवासा.

COMMENTS