तृणमूलच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

तृणमूलच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त

पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे रण तापत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे.

मुलाचे नाव ठेवण्यावरून आई-वडिलांमध्ये भांडण, प्रकरण थेट कोर्टात
कंटेनरने एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले
केंद्राने साखर निर्यात अनुदान न दिल्यास साखर उद्योगासमोर आर्थिक संकट : पी. आर. पाटील

कोलकाता: पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे रण तापत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या दोन नेत्यांची तीन कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ही कारवाई केली असून त्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्त कुणाल घोष आणि खासदार शताब्दी रॉय यांच्यासह शारदा समूहाचे प्रमुख सुदीप्त सेन यांच्या सहकारी देवजारी मुखर्जी यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या तिघांची एकूण तीन कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. एप्रिल 2013मध्ये शारदा चिट फंड घोटाळा उघड झाला. तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगण्यात येते. ईडीच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कुणाल घोष, शताब्दी रॉय आणि देवजारी मुखर्जींकडून तीन कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. माजी खासदार कुणाल घोष हे शारदा मीडिया समूहाचे सीईओ होते. मीडिया समूहाचा प्रमुख होण्यासाठी त्यांनी शारदा समूहाकडून मोठी रक्कम घेतल्याचा घोष यांच्यावर आरोप आहे. घोष यांची यापूर्वी जुलै 2019मध्ये आणि ऑक्टोबर 2019मध्ये याप्रकरणी तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. त्यांची तुरुंगातही रवानगी करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर आहेत. ईडीने नुकतेच त्यांना चौकशीसाठी बोलवले होते. शताब्दी रॉय या शारदा समूहाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडर होत्या, तर देवजारी मुखर्जी या शारदा ग्रुफ ऑफ कंपनीजच्या संचालक होत्या. या घोटाळ्यात ईडीने आतापर्यंत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने ऐन निवडणुकीच्या काळात छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाची प्रतिमा मलिन करून त्याचा फायदा उचलण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

COMMENTS