Homeताज्या बातम्याअहमदनगर

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली झाल्यानंतर त्यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार केली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
बियाण्यांची साठेबाजी, खताची लिंकींग होत असल्यास तक्रार करावी
भालाफेक सुवर्ण विजेता नीरज..मूळचा महाराष्ट्रीयन…

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगावला बदली झाल्यानंतर त्यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार केली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याची तक्रार कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. पदाचा गैरवापर करत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्याकडे ही तक्रार केली आहे.

देवरे यांनी वाळू उपसा, जमिनीचा अकृषक वापर रुपांतरित करून देणे अशा अनेक प्रकरणांत गैरप्रकार केला आहे.संबंधित बातम्या

त्यांनी मोठी वाहने, जेसीबी, डम्पर, ट्रॅक्टर अशी वाहने जप्त केली. त्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले नाही. त्यांच्या या कारवाया संशयास्पद आहे. त्यामुळे या कारभाराची चौकशी व्हावी.’

तक्रार दाखल झाल्यावर अॅड. सरोदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘देवरे यांच्यासारख्या प्रवृत्तींच्या विरोधात आमचा हा अर्ज आहे.

त्यांनी पुढील काळात आपल्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दबाव सहन करावे लागतात.

तसाच अन्याय जर देवरे यांच्यावरही होत असेल तर मी स्वतः वकील म्हणून त्यांच्या बाजूने आहे.

मात्र, केवळ महिला म्हणून त्यांनी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये. या पद्धतीने भ्रष्टाचाराची पाठराखण करता येणार नाही.

चौकशीतून आपली सुटका व्हावी यासाठी भावनिक ऑडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणे हा सुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे.

यामुळे कामाच्या ठिकाणी ज्या महिलांचे लैगिक अथवा अत्याचार होतात. त्याचे गांभीर्य कमी होते.’

क्लिप व्हायरल कशी झाली?

गेल्या महिन्यात ज्योती देवरे यांनी आमदार नीलेश लंके यांच्या विरोधात तक्रार करणारे संभाषण असलेले आणि आत्महत्येचा इशारा देणारी क्लीप व्हायरल झाली.

त्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देवरे यांची भेट घेऊन पाठराखण केली. त्यानंतर हे प्रकरण राजकीय बनत गेले.

लोकप्रतिनिधींकडून त्रास होत असल्याचे वक्तव्य देवरे यांनी क्लिपमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना ही क्लिप त्यांचीच असल्याचे त्यांनी मान्य केले असले तरी ती आपण व्हायरल केली नसल्याचे म्हटले होते.

COMMENTS