…तर भक्तांची दातखीळ बसेल!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

…तर भक्तांची दातखीळ बसेल!

नावात काय आहे, जगप्रसिध्द तत्ववेत्ता शेक्सपिअरचा हा प्रश्न अनेकांना मानवत नाही.ज्यांचा आपल्या कामावर विश्वास नाही त्यांना नावातच अधिक स्वारस्य असते.ए

तरुण तरुणींनी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी लावले हुसकावून (Video)
मळगंगा देवीच्या यात्रेला उत्साहात सुरूवात
ओशो आश्रम गोंधळप्रकरणी 125 जणांवर गुन्हा

नावात काय आहे, जगप्रसिध्द तत्ववेत्ता शेक्सपिअरचा हा प्रश्न अनेकांना मानवत नाही.ज्यांचा आपल्या कामावर विश्वास नाही त्यांना नावातच अधिक स्वारस्य असते.एखाद्याने कामातून कमावलेले नावही या मंडळींना पायात रूतलेल्या काट्यासारखे सतत ठसठसत असतो.स्वतःच्या नावाला वलय मिळावे अशी धडपड करतांना ऐतिहासिक पाऊलखूणा पुसून टाकण्यात या मंडळींचा पुरूषार्थ असतो,राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्यात हाच पुरूषार्थ दाखवला गेला आहे..*लिड*
भारतीय पुरूष संघाने आॕलम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळवल्यानंतर तमाम भारत वासियांचा उर अभिमानाने भरून आला.भारतभूमीचा सुपुत्र ध्यानचंद यांनी या खेळासाठी दिलेले योगदान आठवून नेटीझन्समध्ये कौतूकांचा वर्षाव सुरू झाला.त्याचवेळी भारतीय महिला हाॕकी संघाच्या पदरी पराभव आला असला तरी महिला खेळांडूंनी चाहत्यांचे मन मात्र जिंकले होते.हाॕकी खेळाला सरकारकडून कसे दुर्लक्षीत केले जाते याचीही जोरदार चर्चा सुरू झाली.नेमक्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक ट्विट आले.राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद खेलरत्न केल्याची घोषणा पंतप्रधानांनी ट्विटवरून केली.आणि चर्चेची दिशा अचानक बदलली.पंतप्रधानांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रीया उमटू लागल्या.भक्त मंडळींनी या ट्विटचे भरभरून कौतूक करतांना राजीव गांधी यांचा क्रिडा क्षेत्राशी काय संबंध ? असा प्रश्न उपस्थित केला आणि समाजमाध्यमांवर वाक् युध्द सुरू झाले.
ध्यानचंद यांचे योगदान वादातीत आहे.यावर कुठलाच भारतीय शंका उपस्थित करीत नाही.शंका आहे ती पंतप्रधान यांच्या हेतूवर.भारतीय जनता पक्षाला गांधी घराण्याविषयी असलेले प्रेम सर्वश्रूत आहे.या असूयेतूनच हे नामकरण नाट्य घडल्याचे दिसते. हे नामांतर घडवण्यामागे केवळ विकृत द्वेषबुद्धी आहे.पंतप्रधानांच्या निर्णयाचे समर्थन करतांना काही मंडळी एशियाड खेळांच्या आयोजनापलीकडे राजीव गांधी यांचा खेळांशी काहीही संबंध नव्हता.असा युक्तीवाद करतात.त्याच वेळी केवळ क्रिडा संघटक असलेल्या अरूण जेटली यांच्या नावाने उभ्या असलेल्या स्टेडीयमवर या मंडळींना कुठलाच आक्षेप नाही.अटल पेंशन योजनेसह दिनदयाळ उपाध्याय,सुषमा स्वराज अशा भाजपाशी संबंधीत असलेल्या नेत्यांचा ज्या क्षेत्राशी संबंध नाही अशा अनेक क्षेत्रात नाव लावण्यावर या मंडळींना कुठलाही अपराध वाटत नाही,आक्षेप फक्त राजीव गांधींच्या नावावर. देशातील विविध  योजना, संस्था यांना गांधीच काय कुठल्याही एका परिवाराच्या नावाने ओळख देण्याचा पायंडा समर्थनीय नाहीच.मात्र म्हणून नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकारच्या सुडबुध्दीच्या राजकारणाचे समर्थन करता येणार नाही. जी मंडळी एशियाड गेम्सचे आयोजन करण्यापलीकडे खेळाशी संबंध नाही असा युक्तीवाद त्यांच्या माहीतीसाठी काही टिप्स याठिकाणी देणे क्रमप्राप्त ठरते.एशियाड गेम्सचे आयोजन करण्याच्या निमित्ताने दिल्लीत ६०,००० आसन क्षमतेचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम उभे राहिले. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम, गेम्स व्हिलेज, सिरी फोर्ट ऑडिटोरियम, करणसिंग शूटिंग रेंज या गोष्टी झाल्या.  उड्डाणपूल, रस्ते झाले. खेळांच्या विकासासाठी उत्तम पायाभूत सुविधा, मैदाने, प्रशिक्षणकेंद्रे, खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था  या सोई आवश्यक असतात हे जाणून, राजीव गांधींनी त्या निर्माण करून दाखवल्या. अर्थात तरीही केवळ असूया म्हणून   त्यांच्या नावाचा इतिहास वाॕश आऊट स्वारस्य दाखवून कुणाला असूरी आनंद मिळत असेल तर तो त्यांनी जरूर घ्यावा. केवळ खेळातच नव्हे राजकारणातही खिलाडू वृत्ती अपेक्षीत आहे,नव्हे भारतीय राजकारणाची तीच परंपरा आहे.मात्र  ज्यांना केवळ शत्रुभाव  जागवून कला,क्रिडा असो वा  राजकारण, फक्त ध्रुवीकरणाचे खेळ करण्यात आणि मतांचा व्यापार भरभराटीला नेण्यातच रस असेल, त्यांच्याकडून ही परंपरा शाबूत राखण्याची अपेक्षा तरी कशी करायची?खेलरत्न पुरस्काराचे नामांतर करण्यावर यत्किंचीतही आक्षेप नाही.आक्षेप आहे तो मंडळींच्या हेतूवर.हाॕकीचा खेळ आणि ध्यानचंद यांच्याविषयी या मंडळींना खरोखर एव्हढी सध्मानाची भावना आहे तर गेल्या कित्येक वर्षापासून ध्यानचंद यांना भारत रत्न द्यावे म्हणून मागणी होत आहे या मागणीकडे दुर्लक्ष का केले जात आहे.हाॕकीच्या एकूण खेळाला उपेक्षीत का ठेवले जात आहे.पुर्वीच्या चुका सुधारण्याचा मोदी सरकार प्रयत्न करीत असल्याचा डांगोरा पिटवला जातोय,मग हाॕकीच्या खेळाला प्रायोजक न मिळण्यापर्यंत दुरावस्था का झाली.हाॕकीचा खेळ आजवर बेवारस का ठेवला गेला.हाॕकीला किती आणि कुठल्या खेळाडूंनी पुरस्कार मिळवून दिले याची कुठलीच आकडेवारी का उपलब्ध नाही? अशा अनेक प्रश्नांसोबत आज यशाचे श्रेय लाटण्यासाठी तोंड मारणाऱ्या मंडळींनी ध्यानचंद यांच्या नावाने सन २००२ मध्ये सुरू केलेल्या दहा लाखाच्या पुरस्काराचेही नाव बदलणार का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी स्वीकारावी.आणि जाताजाता सर्वात महत्वाचा मुद्दाही भक्तांनी विचारात घ्यावा.फेब्रूवारीमध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या स्टेडियम नामांतराचाही सोहळा नजरेसमोर आणावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम.काय संबंध आहे नरेंद्र मोदींचा क्रिकेट किंवा अन्य खेळाशी.अदानी, रिलायन्स एन्ड !आता बोला. गुजरातशी ऋणानुबंध असलेले सलीम दुराणी,विनू मंकड,इरफान पठाण,पार्थीव पटेल,रतजीत सिंग गायकवाड,दिलीपसिंग अशा एखाद्या खेळाडूचे नाव देता आले नसते का? बसली का दातखीळ? !खेलरत्न पुरस्कारांचे नामांतर करणारे नेते ध्यानचंदप्रेमी आणि खरे हाॅकी चाहते आहेत, 

COMMENTS