…तर, नगर अर्बनच्या प्रशासकांना काळे फासणार ; अर्बन बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, नगर अर्बनच्या प्रशासकांना काळे फासणार ; अर्बन बचाव कृती समिती आक्रमक पवित्र्यात

नगर अर्बन बँक वाचवण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या व कायदेशीर बाबींच्या माध्यमातून बँकेच्या अडचणी दूर होण्याची आशा बाळगणार्‍या नगर अर्बन बचाव कृती समितीने आता आक्रमक भूमिकेची तयारी सुरू केली आहे.

Sangamner : वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव | LOKNews24
कोपरगाव सोसायटीच्या सभासदांना पंधरा टक्के लाभांश ः  वैभव आढाव
अबॅकस अकॅडमी राजूरच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी


अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन बँक वाचवण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या व कायदेशीर बाबींच्या माध्यमातून बँकेच्या अडचणी दूर होण्याची आशा बाळगणार्‍या नगर अर्बन बचाव कृती समितीने आता आक्रमक भूमिकेची तयारी सुरू केली आहे. बँकेच्या थकबाकीदारांकडून कर्जवसुली होत नसल्याने व त्याबाबतची वस्तुस्थितीही सभासदांसमोर मांडली जात नसल्याने आंदोलनाची भूमिका घेऊन प्रशासकांना काळे फासण्याचा इशारा दिला गेला आहे. यासंदर्भात नगर अर्बन बचाव कृती समितीचे काही सदस्य येत्या एक-दोन दिवसात बँकेच्या प्रशासकांना भेटून आंदोलन इशार्‍याची माहिती देणार आहेत.

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सोशल मिडियातून नगर अर्बन बँकेच्या प्रशासकांचा व प्रशासनाचा कारभार यावर भाष्य केले आहे. बँकेवर प्रशासक येवून आता दोन वर्षे झाली आहेत. पण बँकेची वसूली खूप अल्प झाली आहे, त्यामुळे याचा जाब प्रशासकांना विचारायचा सभासदांना कायदेशीर हक्क आहे, असे यात त्यांनी स्पष्ट केले असून, नगर अर्बन बँक जर जाणीवपूर्वक बंद करण्यात येत असेल व प्रशासक पण या काळ्या कटकारस्थानात सहभागी होत असतील तर या प्रशासकांना काळे फासण्याची तयारी ठेवावी लागेल. सभासदांवर केसेस झाल्या तरी चालतील. पण, बँक वाचविण्यासाठी आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तपशील जाहीर करण्याची मागणी

याबाबत माजी संचालक गांधी यांनी सांगितले की, नगर अर्बन बँक अडचणीतून बाहेर येवूच द्यायची नाही, असाच काही भ्रष्ट मंडळींचा डाव आहे. 2016 पासून सिक्युरटायझेशनच्या जवळपास 200 ते 225 नोटिसा थकबाकीदारांना पाठविल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात किती कर्जदारांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या? किती मालमत्तांचे लिलाव झाले?, याची माहिती जाहीर केली जात नाही. जप्त केलेल्या अनेक प्रॉपर्टींना लगेचच ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. पण, प्रॉपर्टी जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे जाणीवपूर्वक (अर्थपूर्ण?) टाळले जात आहे, असा दावा करून ते म्हणाले, प्रशासक व प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला वसुलीला जाणारे बँकेचे प्रामाणिक कनिष्ठ कर्मचारी यांच्यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांकडून संवाद होवू दिला जात नाही व दुसरीकडे त्यांच्याकडूनच प्रशासकांसमोर वसुली होणे अवघड असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे व प्रशासकांनी तसा रिपोर्ट रिझर्व्ह बँकेला देवून बँक बंद पाडण्याचे कारस्थान सुरू आहे, असा दावा करून गांधी म्हणाले,  प्रशासकांनी या 200 कर्जखात्यांची यादी, त्यांना दिलेल्या नोटिसा, प्रत्यक्ष जप्त झालेल्या प्रॉपर्टी व लिलाव होवून वसूल झालेल्या रकमेचा तपशील सभासदांसमोर जाहीर करावा व सभासदांनी देखील यासाठी मागणी प्रशासकांकडे करावी व त्यासाठी मोठे आंदोलन करण्याची तयारीही ठेवावी, असेही गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

चौकट

गुन्हे नाहीत व माहितीही नाही

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोनेतारण घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या प्रशासनाकडून पोलिसात जाण्यासाठी चालढकल केली जात आहे. तसेच दुसरीकडे बँकेचा ऑडिट रिपोर्ट सभासदांना देणे बंधनकारक असताना त्याची माहिती सभासदांनाच नव्हे तर बँकेच्या माजी संचालकांनाही दिली जात नाही. बँकेद्वारे सध्या सुरू असलेल्या कामकाजाबाबतही गोपनीयता पाळली जात आहे. मात्र, यामुळे बँकेचे नुकसान होण्याचा दावा बँक बचाव कृती समितीचा आहे. बँकेच्या प्रशासकांनी व प्रशासनातील अधिकार्‍यांनी बँक वाचवण्याच्या उद्देशाने काम करावे व यासाठी बँकेच्या अभ्यासू सभासदांशी संवाद ठेवावा, असे आवाहनही बचाव कृती समितीने केले आहे.

ईींंरलहाशपीीं रीशर

COMMENTS