तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ –  विनोदसिंग परदेशी

Homeताज्या बातम्याअहमदनगर

तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ – विनोदसिंग परदेशी

राजकीय पक्षच्या कार्यकर्त्यामुळे तरूणाचे विचार भरकटले आहेत. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याची |खरी ताकद तरुणामध्ये, आहे. तरुणांनी राजकारणात येण्याची

अखेर बच्चू कडू यांनी सोडला मंत्रिपदावरचा दावा
शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा

राजकीय पक्षच्या कार्यकर्त्यामुळे तरूणाचे विचार भरकटले आहेत. समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याची |खरी ताकद तरुणामध्ये, आहे. तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ असल्याचे मत प्रहारचे जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी मांडले. समाजप्रबोधनकार शिवशहिर कल्याण काळे यांनी आपल्या भाषणातुन कार्यकर्त्याचा कढीपत्या सारखा वापर होतो. अशी खंत व्यक्त केली होती. तोच धागा पकडुन परदेशी म्हणाले.तरुणांनी स्वतःला समाजकारणात झोकुन देऊन काम करावे. व आपल्या कार्य कर्तृत्व सिद्ध करावे इतर पक्षात कढीपत्यासारखा वापर होतो. त्यासाठी समाजसेवा व राजकारणासाठी प्रहारहाच उत्तम विचाराचा पक्ष आहे. प्रशासकिय अधिकारी कर्मचाऱ्याकडुन समाजहिताचे काम झाले तर प्रहार सैनिक त्याचा आदर सत्कार करेल मात्र शेतकरी, शेतमजुर, दिनदलीत दिव्यांग यांना वेठीस धरले तर त्याची गय केली जाणार नाही.आम्हाला पक्ष प्रमुख नामदार बच्चू कडू साहेबांचा विचारांची शिदोरी आमच्या सोबत आहे. शेवगाव- नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा या चौफुल्यावर प्रहारचे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी प्रहारचे जेष्ठ नेते डॉ. दादासाहेब काकडे, प्रमुख पाहुणे म्हणुन प्रहारचे जिल्हा सचिव प्रकाश बेरड, दिव्यांग जिल्हा अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, मालोजी शिखरे, रामभाऊ शिंदे, नितीन पानसरे प्रहारचे शेवगाव – पाथर्डी विधानसभा अध्यक्ष रामजी शिदोरे, शेवगाव तालुकाअध्यक्ष संदिपराव बामदळे, समाजप्रबोधनकार कल्याण काळे, राष्ट्रीय भारूडकार हमीद सय्यद, तुकाराम शिंगटे विचारमंचावर उपस्थित होते.
या वेळी नितीन पानसरे, रामजी शिदोरे, पत्रकार बाळासाहेब जाधव, राजेश लोढे, कल्याण काळे, संदिप बामदळे, प्रकाश बेरड, दादासाहेब काकडे यांची भाषणे झाली. यावेळी कामधेनु पतंसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचाव जनआंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे,भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, माजी सरपंच अशोकराव दुकळे, अॅड.सागर चव्हाण, सचिन राशिनकर, प्रवीण निकम, जेष्ठ पत्रकार आर.आर.माने, शहारामआगळे,रामदास लिंभोरे, महेश घनवट, विकास गटकळ,युवक राष्ट्रवादीचे विठ्ठल आढाव, गणेश खंबरे, अनिल मेरड, अशोक चितळे, आदिनाथ खरड, आण्णासाहेब दुकळे, सतिष पवार, महादेव आहेर, बाळु वीर, हरिचंद्र जाधव, संजय फाटके, लक्ष्मण आगळे, संदिप काळे, आण्णासाहेब खरड यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामजी शिदोरे यांनी केले तर आभार कल्पेश दळे यांनी मानले.

COMMENTS