तपोरत्न प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांना  वीरशैव समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण..

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तपोरत्न प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांना वीरशैव समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण..

आपल्या भावना व्यक्त करताना भक्तगणं झाले भावुक.... माजलगाव येथील सद्गुरू मिस्किन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती वीरशैव व असंख्य भक्ताचे श्रद्

पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने आजीचा चिरला गळा .
KRK यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात केले दाखल
शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

आपल्या भावना व्यक्त करताना भक्तगणं झाले भावुक….

माजलगाव येथील सद्गुरू मिस्किन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती वीरशैव व असंख्य भक्ताचे श्रद्धास्थान  तपोरत्न प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांचे १० सप्टेंबर  रोजी  वृद्धापकाळाने शिवचरणी लीन झाले. माजलगावकर महाराजांच्या जाण्याने समाजाचा आधारवड कोसळला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी  प्रभु पंडिताराध्य मंगलभवन जायकवाड़ी वसाहत गेवराई येथे कार्यक्रम ठेवण्याला आला होता.
. महाराजांच्या जाण्याने समाजाचा आधारवड कोसळला आहे. माजलगावकर महाराजांना गेवराईकरांच्या वतीने  आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी गेवराई विरशैव समाजाच्या महिलांनी भजनाचे आयोजन केले होते.या श्रद्धांजली शोक सभेला शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री बदामराव पंडित,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित ,भाजपाचे युवानेते शिवराज पवार.यांच्यासह गेवराई शहरातील यांच्यासह गेवराई शहरातील वीरशैव समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS