अलिकडच्या काळात व्यवहार प्रभावी ठरू लागल्याने विचार मागे पडला आहे.तत्वनिष्ठेला मुठमाती दिली जात असून व्यक्तीनिष्ठा पुजनीय ठरून व्यवहाराचा काटा सामर्थ
अलिकडच्या काळात व्यवहार प्रभावी ठरू लागल्याने विचार मागे पडला आहे.तत्वनिष्ठेला मुठमाती दिली जात असून व्यक्तीनिष्ठा पुजनीय ठरून व्यवहाराचा काटा सामर्थ्यवान झाल्याने केडर बेस राजकारणाची सद्दी संपली आहे.आता कार्यकर्त्यांना विचार नव्हे तर व्यवहार शिकवला जात असल्याने पक्षाच्या धोरणांना हरताळ फासून व्यवहार करणारे नेत्यांच्या झुंडी तयार होऊ लागल्या आहेत.विचार आचार धोरण कशाचाच कशाला पायपोस उरला नाही.विचारातून नव्हे तर व्यवहारातून कार्यकर्त्याची ओळख पटवून घ्यावी लागत आहे.
साधारण तीस चाळीस वर्षापुर्वी कार्यकर्ता किंवा नेता काय बोलतो,काय घालतो,कसा वागतो यावरून तो कुठल्या विचारसरणीचा अथवा पक्षाचा आहे हे लोक चटकन ओळखून घ्यायचे.तो बोलायला उभा राहिला तर काय बोलू शकतो याचाही अंदाज श्रोत्यांना आधीच यायचा.अलिकडच्या काळात मात्र हे चित्र पार पालटून गेले आहे,आपण कुठल्या विचारसरणीच्या राजकीय पक्षात आहोत याचे भान कार्यकर्त्याला नसतेच पण नेताही अनेकदा भान हरपून वर्तन करतो.अलिकडच्या काळात व्यवहार प्रभावी ठरू लागल्याने विचार मागे पडला आहे.तत्वनिष्ठेला मुठमाती दिली जात असून व्यक्तीनिष्ठा पुजनीय ठरून व्यवहाराचा काटा सामर्थ्यवान झाल्याने केडर बेस राजकारणाची सद्दी संपली आहे.आता कार्यकर्त्यांना विचार नव्हे तर व्यवहार शिकवला जात असल्याने पक्षाच्या धोरणांना हरताळ फासून व्यवहार करणारे नेत्यांच्या झुंडी तयार होऊ लागल्या आहेत.विचार आचार धोरण कशाचाच कशाला पायपोस उरला नाही.विचारातून नव्हे तर व्यवहारातून कार्यकर्त्याची ओळख पटवून घ्यावी लागत आहे
पक्षाच्या विचारांना झोकून देण्याचा, ध्येय, धोरणे व्यक्तिगत जीवनातही पाळण्याचा काळ आता राहिला नाही. साधारण पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन विचारसरणी भारतीय राजकारणात प्रचलीत आहेत.त्यावरून उजवे आणि डावे असे दोन गट मानले जातात.डावे म्हटले की कम्युनिस्ट नजरेत भरतात.आणि उजव्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्या विचाराशी सहमत असलेले इतर हिंदूत्ववादी पक्ष आठवतात.या देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेली काँग्रेस आणि इतर छोट्या मोठ्या प्रांतिक आघाड्या ना इकडचे ना तिकडचे ,दोन्ही तीरावर पाय रोवून उभे राहण्याच्या प्रयत्नात रचनाच फाडून घेतल्यागत या मंडळींची अवस्था आहे.म्हणूनच धर्मनिरपेक्ष असे साधे सोपे सहज पचनी पडणारे तत्वज्ञान या मंडळींनी स्वीकारले असा देखावा निर्माण करण्यात ही मंडळी आजवर यशस्वी झाली.त्यातल्या त्यात धर्मनिरपेक्ष म्हणविणारी ही मंडळी स्वतःला पुरोगामी समजण्यात धन्यता मानतात,हे आजवरचे चित्र आता मात्र बदलले आहे.अनेक पुरोगाम्यांनी मुळ विचाराला फाटा देऊन लपूनछपून प्रतिगाम्यांचे कर्मकांड स्वीकारले आहे तर प्रतिगाम्यांनी धुळफेक करण्यापुरते तेव्हढे कर्म करण्याचा आव आणला.बाकी त्यांच्यापेक्षा पुरोगामी बरे असेच त्यांचे वर्तन राहीले आहे.पुरोगामी म्हणविणाऱ्या नेत्यांच्या घरातही साग्रसंगीत सत्यनारायणाच्या महापूजा व्हायला लागल्या आहेत. कांशीराम मायावातींचे अनुयायीही गल्लीबोळातील गुणवंत बाबांच्या आहारी गेले आहेत. पूर्वी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हटला की तो तत्त्व आणि विचारांचा पक्का असे गृहीत धरले जायचे परंतु आता त्याच पक्षाच्या नेत्यांच्या घरात, कार्यालयात कर्मकांडांचा सोहळा बघायला मिळतो. बसपाचा कार्यकर्ता हत्तीला गणरायाची उपमा द्यायला लागला आहे. केडर बेस प्रशिक्षणातून पुर्वी कार्यकर्ता घडवला जात होता तेंव्हा वैचारीक अधिष्ठान पक्के व्हायचे.विचार मनावर नसानसात बिंबवले जायचे.आज अशा प्रशिक्षणांमधून कार्यकर्त्यांना तात्त्विक बैठकपेक्षा व्यावहारिक बैठक कशी असावी हे शिकवले जात आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी हा जवळचा रस्ता धरल्याने तत्त्व आणि विचारांचा वळसा घालून राजकीय प्रवास करायला कुणी धजावत नाही.आजच्या नेत्यांची विधाने आणि कार्यकर्त्यांचा राडा पाहील्यानंतर राजकीय पक्ष वैचारीक गोंधळात सापडल्याचे जाणवते.कुणी इकडून तिकडे उडी मारते तर तिकडून एखादी झुंड इकडे येऊन मिसळते.एका रात्रीत ध्येय तत्व निष्ठा बदलली जाते.पुर्वी तत्वासाठी निष्ठेसाठी जीव द्यायलाही तयार असलेल्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आज प्रचंड उणिव भासत आहे,तत्वनिष्ठेवरून आठवले.यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना संरक्षणमंत्री म्हणून जाण्याची संधी त्यांना मिळाली.आपल्या पश्चात महाराष्ट्राची सुत्रे सांभाळणारा नेता ते शोधत होते.नेमक्या वेळी त्यांच्यासमोर एक चेहरा आला आणि त्यांनी पुणे स्थित येरवडा मध्यवर्ती कारागृह गाठले.मी दिल्लीला जातोय.,तु महाराष्ट्र सांभाळ अशी सुचना वजा आदेश यशवंतरावांनी येरवडा कारागृहात बंद असलेल्या त्या व्यक्तीला दिला.त्या व्यक्तीने तेव्हढ्याच बाणेदारपणाने तुमची सत्ता तुम्हाला लखलाभ होवो,मी माझे तत्व सोडणार नाही.अखेरपर्यंत शेतकरी कामगार कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी व्यवस्थेसोबत लढणार असे उत्तर देऊन मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले,ती व्यक्ती होती,संगमनेरचे पहिले आमदार अहमदनगर जिल्ह्याचे पहिले सिव्हील इंजिनिअर लालबावटा.लालनिशाण पक्षाचे संस्थापक काॕ,दत्ता देशमुख.ही होती निष्ठा.जुने जाणते नेते आजही ही आठवण सांगतात, आज साध्या संस्थेच्या अध्यक्ष पदाचे अमिष मिळाले तरी पक्षाची निष्ठा पायदळी तुडवली जाते.
.तत्त्वांना चिकटून बसण्यापेक्षा वारंवार शब्द फिरवत पटापट पदे पदरात पाडून कशी घ्यावीत याचे धडे सध्या सगळ्याच पक्षात दिले जात आहेत. तत्त्व, धोरणे किंवा वैचारिक बैठक हा विषय निघाला की हल्ली नेत्यांनाही डुलकी लागते. कार्यकर्त्यांनाही हाच अनुग्रह मिळतो.काँग्रेसचे दीर्घकाळ कार्यकर्ते म्हणवून घेणारे अनेक लोक बुरसटलेल्या विचारांना कवटाळून बसतात.इंदिरा गांधींचे कौतुक करताना घरातल्या स्त्रीने डोक्यावरचा पदरही ढळू देता कामा नये असा त्यांचा अट्टाहास असतो.खायचे वेगळे दाखवायचे वेगळे या अनुरूप व्यक्तिगत आणि राजकीय जीवन असा भेद उभा करून हे लोक खुशाल वाटेल ती कर्मकांडे करतात,मी आहे जिथे तेच तत्व,तीच निष्ठा अशी ही हेळसांड राजकारणाला लागलेली वाळवी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
COMMENTS