सध्याच्या जीवनशैलीत मोबाईल,(Mobile) लॅपटॉप(Laptop) व यांसारखी उपकरणे आपण दररोज हाताळत असतो. सतत या उपकरणांचा वापर केल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होऊ
सध्याच्या जीवनशैलीत मोबाईल,(Mobile) लॅपटॉप(Laptop) व यांसारखी उपकरणे आपण दररोज हाताळत असतो. सतत या उपकरणांचा वापर केल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होऊ लागतोसतत फोनचा वापर केल्याने डोळ्यांची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होण्याच्या समस्या जास्त वाढतात. त्यामुळे आपण डोळ्यांची सतत काळजी घ्यायला हवी. आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.

१. लहान मुले व किशोरवयीन, तरुण आणि प्रौढांना पालेभाज्या खाणे आवडत नाही, परंतु, ते डोळ्यांसाठी खूप आरोग्यदायी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे(Vitamins) आणि खनिजे(Minerals) आहेत. डोळ्यांसह शरीरातील अनेक अवयवांना त्यांचा फायदा होतो. हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants)असल्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. तसेच मॅक्युलर डिजेनेरेशन(Macular degeneration) देखील कमी करता येतात.

२. आपल्याला आहारात अंडीचा समावेश केल्यास त्याचा देखील फायदा होतो. अंड्यातील पिवळ्या बलकांमध्ये अँटिऑक्सिडंट्स(Antioxidants) असतात. ज्यामुळे आपल्याला डोळ्यांना त्याचा फायदा होतो. पुरेशा प्रमाणात डोळ्यांना प्रथिने मिळाल्यास डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते.

अंड्यातील पिवळ्या बलकाचा डोळ्यांना फायदा होतो .
३. बदाम(Almonds) खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. बदामामध्ये जीवनसत्त्व ई (Vitamin E) आढळून येते. ज्याचा वापर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी केले जाऊ शकते .

४. टोमॅटोत ल्युटीन,लाइकोपीन(Lutein, lycopene) नावाचे घटक असल्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यास दूरदृष्टी वाढवण्यास त्याचा फायदा होतो. यात अँटिऑक्सिडंट्स(Antioxidants) पुरेसे प्रमाणात असल्यामुळे डोळे निरोगी राहतात.

COMMENTS