डेंग्यू नियंत्रणासाठी नऊ राज्यात केंद्रीय पथके

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डेंग्यू नियंत्रणासाठी नऊ राज्यात केंद्रीय पथके

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, दिवाळी-दसरा या उत्सवाच्या काळात देखील रुग्ण संख्या झपाटयाने कमी झाली असली तरी अनेक राज्यात डेंग्य

डोळ्यात पाणी आणणारी एस टी कर्मचाऱ्यांची कहाणी l LOKNews24
कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकार्‍यांनी केली तपासणी
पावसाची हवामान विभागालाच हुलकावणी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, दिवाळी-दसरा या उत्सवाच्या काळात देखील रुग्ण संख्या झपाटयाने कमी झाली असली तरी अनेक राज्यात डेंग्यूच्या रूग्ण संख्येने कहर केला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून, नऊ राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात केंद्रीय पथके पाठवण्यात आली आहेत.
तज्ज्ञांच्या टीममध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे अधिकारी समाविष्ट आहेत. अलीकडेच 1 नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत देशातील डेंग्यूच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. परिस्थितीवर प्रकाश टाकताना मंडाविया यांनी सांगितले की, अनेक गरीब लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे आणि प्लेटलेटची संख्या कमी असल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे. सध्या राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू आणि केरळ ही डेंग्यूची सर्वाधिक प्रभावित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. डेंग्यू शोधण्यासाठी चाचणी ही सर्वात महत्त्वाची पायरी असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व प्रकरणांची नोंद व्हावी आणि लोकांना योग्य वागणूक मिळावी यासाठी तपासाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकार्‍यांना दिले. दिल्लीतही मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.

महाराष्ट्रात डेंग्यू रुग्णांची संख्या मोठी
महाराष्ट्रात देखील डेंग्यू रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात नोंदवली असून, डेंग्यू नियंत्रणासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात धडकणार आहेत. पुणे महानगरपालिकेने ऑक्टोबर महिन्यात या आजाराची 168 प्रकरणे नोंदवली आहेत. सप्टेंबरमध्ये शहरात नोंदवण्यात आलेल्या डेंग्यूच्या 192 रुग्णांपेक्षा हे प्रमाण कमी असले तरी त्यात थोडीशी घट आहे. तर चंदीगडमध्ये आतापर्यंत या आजाराने 33 जणांचा बळी घेतला आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोंदवण्यात आलेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या गेल्या तीन वर्षांतील वार्षिक रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे.

COMMENTS