डीवायएसपी तानाजी बरडे यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर

Homeमहाराष्ट्रसातारा

डीवायएसपी तानाजी बरडे यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर

महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल त्यांच्या सन्मानासाठी पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे.

सत्ताधारी सत्तेवर आल्यास हाही कारखाना खाजगी होईल : डॉ. इंद्रजित मोहिते
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ
‘…बस चमचो से परेशान है’


फलटण / प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल त्यांच्या सन्मानासाठी पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे.

रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूरच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यापासून गेली सुमारे 6 वर्षे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देवून उत्कृष्ट काम केले असल्याची नोंद घेऊन पोलीस महासंचालकांनी त्यांना सन्मान चिन्ह जाहीर करुन त्यांच्या कामाचा, उत्कृष्ट पोलिस सेवेचा गौरव केला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून 6 वर्षांपूर्वी पोलीस दलात निवड झाल्यानंतर प्रशिक्षण, परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर भामरागड (गडचिरोली) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उत्तम काम केल्यानंतर त्यांना सन 2019 मध्ये फलटण (सातारा) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

गेल्या 2 वर्षात फलटण उपविभागातील फलटण, खंडाळा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती व गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याबरोबर विविध निवडणूका, यात्रा, सामाजिक कार्यक्रम येथील सुरक्षितता सांभाळण्याबरोबर गेल्या सुमारे दीड वर्षांपासून कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यातही उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे योगदान कौतुकास्पद राहिले आहे. पोलीस महासंचालकांच्या सन्मान चिन्हाबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

COMMENTS